VIDEO : रणजी अंतिम सामन्यात आर.पी सिंगने घेतला चाहत्याशी पंगा

By Admin | Updated: January 15, 2017 10:11 IST2017-01-15T10:11:55+5:302017-01-15T10:11:55+5:30

काल झालेल्या अंतिम सामन्यात आर.पी सिंगची असभ्य वर्तणूक कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे आर.पी चर्चेत आला आहे.

VIDEO: Rp singh wins Ranji final in Ranji final | VIDEO : रणजी अंतिम सामन्यात आर.पी सिंगने घेतला चाहत्याशी पंगा

VIDEO : रणजी अंतिम सामन्यात आर.पी सिंगने घेतला चाहत्याशी पंगा

ऑनलाइन लोकमत
इंदूर, दि. 15 : पहिल्यांदाज रणजी चषकावर नाव कोरणाऱ्या गुजरात संघातील स्टार खेळाडू आर.पी. सिंग वादाच्या भोवाऱ्यात अडकला आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात आर.पी सिंगची असभ्य वर्तणूक कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे आर.पी चर्चेत आला आहे. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली पहिलावहिला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या संघात रुद्र प्रताप सिंगचा समावेश होता
 
सातत्यपूर्ण कामगिरीच्या आधारे रुद्रप्रताप सिंगने गुजरातच्या विजयात महत्वपुर्ण  योगदान दिले आहे. मुंबई आणि गुजरातमध्ये रणजीचा अंतिम सामना रंगात असताना आर.पी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी सीमारेषेजवळच आर.पी सिंगचे काही चाहते उपस्थित होते. या चाहत्यांनी त्याच्याकडे सेल्फीची मागणी केली. मात्र या चाहत्यांसोबत सेल्फी काढण्याऐवजी किंवा त्यांना नम्रपणे नकार देण्याऐवजी त्याने एका चाहत्याचा मोबाईल काढून घेतला आणि सीमारेषेजवळ टाकून दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 
 
याआधी आर.पी सिंगने सामना पाहायला आलेल्या काही प्रेक्षकांना मधले बोट दाखवले होते. मुंबई विरुद्धच्या रणजी सामन्यातच हा प्रकार घडला होता. 
 

Web Title: VIDEO: Rp singh wins Ranji final in Ranji final