अन ऑलिम्पिकमध्ये वाहिले 'प्रेमाचे वारे'...

By Admin | Updated: August 15, 2016 11:04 IST2016-08-15T11:00:35+5:302016-08-15T11:04:11+5:30

रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या चीनच्या खएळाडूला तिच्या बॉयफ्रेंडने सभागृहातच लग्नाची मागणी घातली.

Unlike the 'love winds' in the Olympics ... | अन ऑलिम्पिकमध्ये वाहिले 'प्रेमाचे वारे'...

अन ऑलिम्पिकमध्ये वाहिले 'प्रेमाचे वारे'...

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
रिओ दि जानेरो, दि. १५ - ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून देशाचची मान अभिमानाने उंचावण हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असतं आणि सर्वजण त्यासाठी जीवतोड मेहनतही घेतात. मात्र त्यापैकी काही नशीबवानांचेच हे स्वप्न पूर्ण होते, तर काहींना यशाने हुलकावणी दिली तरी ते निराश न होता पुन्हा पुढच्या सीझनसाठी कसून तयारीला लागतात. रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली चीनची खेळाडू 'हे झी' हिनेही महिलांच्या  ३ मीटर स्प्रिंगबोर्ड क्रीडाप्रकारात 'सुवर्ण' पदक पटकावण्याचे स्वप्न पाहिले होते मात्र रविवारी तिचा दुसरा क्रमांक आल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हातातोंडाशी आलेला विजय असा निसटल्यामुळे दु:खी झालेल्या 'हे झी' हिला मात्र तिचा बॉयफ्रेंड, कीन कै याने ऑलिम्पिकमध्ये  लग्नासाठी प्रपोझ करत एक सुखद धक्का दिला. तिनेही त्याला होकार दिला आणि ऑलिम्पिकमध्ये प्रेमाचे वारे वाहू लागले. त्या दोघांच्या या प्रेमाला साक्षीदार होते हजारो उपस्थित प्रेक्षक, ज्यांना टाळ्यांच्या कडकडात त्यांचे अभिनंदन केले. 
कीन काय व ही झे हे ब-याच काळापासून एकत्र असून या खेळामुळेच त्यांची भेट झाली. माजी खेळाडू असलेला कीन याने खएळ संपल्यावर, रौप्य पदक मिळाल्याने दु:खी झालेल्या हे झी हिच्यासमोर अतिशय गंभीर चेह-याने जात एक बॉक्स उघडला. मात्र त्यातील अंगठी पाहून हे झी ला भरून आले. तिने लग्नाचे प्रपोझल अॅक्सेप्ट करताच कीन कैने हजारो उपस्थितांसमोरच तिच्या बोठात अंगठी घातली आणि संपूर्ण सभगृह टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमून गेले. 
 

Web Title: Unlike the 'love winds' in the Olympics ...