सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होणार अंडर-१७ फिफा विश्वचषक

By Admin | Updated: May 30, 2015 01:52 IST2015-05-30T01:52:24+5:302015-05-30T01:52:24+5:30

भारतात होणारी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात होणार असून, यातील सहापैकी चार ठिकाणांना मंजुरी देण्यात आली आहे. स्पर्धा संयोजन समितीने ही माहिती दिली.

Under-17 FIFA World Cup to be held in September-October | सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होणार अंडर-१७ फिफा विश्वचषक

सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होणार अंडर-१७ फिफा विश्वचषक

मुंबई : भारतात होणारी १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धा सप्टेंबर- आॅक्टोबर महिन्यात होणार असून, यातील सहापैकी चार ठिकाणांना मंजुरी देण्यात आली आहे. स्पर्धा संयोजन समितीने ही माहिती दिली.
स्पर्धा संयोजक जेव्हियर सेपी पत्रकार परिषदेत म्हणाले, या चार ठिकाणांत मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम, गुवाहाटी, कोलकाता आणि कोची यांचा समावेश आहे. आणखी तीन ठिकाणांची निवड होणार असून, गोवा, चेन्नई, दिल्ली, बंगलोर किंवा पुणे यातून निवड होणार आहे. त्याचबरोबर इंडियन सुपर लीग स्पर्धेसाठी या स्पर्धेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचेही सेपी यांनी यावेळी स्पष्ट केले.
सेपी म्हणाले, १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेची पात्रता फेरी मे अखेरीस संपणार आहे. मुख्य स्पर्धेपूर्वी किमान तीन महिने ही फेरी संपणे आवश्यक आहे. त्यामुळे ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यापूर्वी होणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या स्पर्धेत भारतासह आशियातील अन्य चार संघ मैदानात उतरतील. त्याचबरोबर युरोपमधील सहा, उत्तर अमेरिका आणि कॅरेबियामधील चार, दक्षिण अमेरिकेतील चार, आफ्रिकेतील चार व ओशियानाचा एक संघ सहभागी होणार आहे.
सेपी म्हणाले, ‘एआयएफएफशी केलेल्या विचारविनिमयानंतरच स्पर्धेचा कालावधी ठरवण्यात आला आहे. आम्हाला माहीत आहे की, आयएसएल व आय लीग स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. मात्र, भारतात ८७ वर्षांनंतर १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा होत आहे.’

Web Title: Under-17 FIFA World Cup to be held in September-October