शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

इंग्लंड-अफगाणिस्तानमध्ये आज औपचारिक लढत

By admin | Updated: March 13, 2015 00:47 IST

विश्वचषकाच्या अ गटात खराब कामगिरी करणारे इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ आधीच स्पर्धेबाहेर झाल्यानंतर उभय संघांत उद्या होणारी साखळी लढत

सिडनी : विश्वचषकाच्या अ गटात खराब कामगिरी करणारे इंग्लंड आणि अफगाणिस्तान संघ आधीच स्पर्धेबाहेर झाल्यानंतर उभय संघांत उद्या होणारी साखळी लढत केवळ औपचारिकता असेल. बांगलादेशाकडून इंग्लंड पराभूत झाला. अफगाणिस्तान संघ बांगलादेशाकडून प्रेरणा घेऊन समारोपाच्या सामन्यात सनसनाटी निर्माण करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. या सामन्याचा निकाल अ गटात तळाच्या स्थानावर कुठला संघ असेल, हे निश्चित करेल.अ‍ॅडिलेड येथे सोमवारी बांगलादेशाने इंग्लंडला १५ धावांनी धूळ चारून स्पर्धेबाहेर ढकलले. इंग्लंडपुढे तळाच्या स्थानावर राहण्याची नामुष्की टाळण्यासाठी उद्या विजय मिळविण्याचे आव्हान असेल. या दोन्ही संघांनी केवळ स्कॉटलंडवर विजय मिळविला आहे. इंग्लंडला आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडूनही दारुण पराभव पत्करावा लागला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी इंग्लंडचे कोच पॉल फारब्रेस म्हणाले, ‘‘हा सामना गमावल्यास आमची स्थिती आणखी खराब होऊ शकते.’’इंग्लंड-अफगाणिस्तान वन डेत प्रथमच परस्परांविरुद्ध खेळणार आहेत. अफगाणिस्तानचे कोच अ‍ॅण्डी मोल म्हणाले, ‘‘बांगलादेशाचा आदर्श आम्ही डोळ्यांपुढे ठेवू. तो सामना फारच अटीतटीचा झाला; पण इंग्लंडसाठी काहीही चांगले नव्हते. आमच्या संघाने तो सामना बारकाईने पाहिला आणि आपल्या चुकांचा अभ्यास केला. फलंदाजीत आमचे खेळाडू संयम राखून खेळल्यास उर्वरित काम गोलंदाज व क्षेत्ररक्षक पार पाडतील.’’ अफगाणिस्तानला आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडूनही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते; पण गोलंदाज हामीद हसन याच्या मते, इंग्लंडविरुद्ध खेळताना संघात भीतीचे वातावरण नाही. तो म्हणतो, ‘‘अफगाणी कधीही भीती बाळगत नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर अधिक सामन्यांचा अनुभव नसल्याने अनुभवहीनता अडथळा ठरू शकेल.’’ (वृत्तसंस्था)