शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वज्रमूठ पडद्याआड

By admin | Updated: June 5, 2016 04:12 IST

भारतीयांना महान मुष्टियोद्ध्यांना पाहण्याची संधी १९८० मध्ये मिळाली होती. तेव्हा त्यांच्या प्रदर्शनीय लढतीचे वर्णन ‘ग्रेटेस्ट टू ग्रेटेस्ट’ असे करण्यात आले होते.

नवी दिल्ली : भारतीयांना महान मुष्टियोद्ध्यांना पाहण्याची संधी १९८० मध्ये मिळाली होती. तेव्हा त्यांच्या प्रदर्शनीय लढतीचे वर्णन ‘ग्रेटेस्ट टू ग्रेटेस्ट’ असे करण्यात आले होते.अली यांनी दिल्ली, मुंबई आणि चेन्नईत प्रदर्शनीय लढती खेळल्या होत्या. तेव्हा ते लंडनस्थित एनआयआय उद्योगपती लॉर्ड स्वराज पॉल यांच्या निमंत्रणामुळे येथे आले होते. लॉर्ड पॉल यांनी श्रद्धांजली देताना म्हटले, की तो खऱ्या अर्थाने महान होता. भारतात त्याला पाहून प्रेक्षक रोमांचित झाले होते. त्यातही सर्वसामान्य प्रेक्षकांपेक्षा खेळाडू अली याच्याशी संवाद साधल्यानंतर जास्त रोमांचित झाले होते. त्यातील एक तमिळनाडूचा रेंडोल्फ पीटर्स होता. त्याला अली यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली होती. तो म्हणाला, की मी त्या वेळी रेल्वेचा फेदरवेट चॅम्पियन होतो. २५ वर्षांचा होतो आणि त्या वेळी मी त्यांच्याशी हस्तांदोलन केले होते, याचे आजही मला स्मरण आहे. तेव्हा मी त्यांच्याशी लढण्याची विनंती केली, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले आणि ‘तू इतका छोटा असून माझ्याबरोबर खेळू इच्छितो. मी एकाच हुकमध्ये तुला स्टेडियमच्या बाहेर फेकून देईन,’ असे म्हणाले. मी स्मित केले आणि प्रदर्शनीय लढतीनंतर त्यांनी काही स्थानिक मुष्ट्यिोद्ध्यांना बोलावले व माझी इच्छादेखील पूर्ण केली.अल्पपरिचय१७ जानेवारी १९४२ रोजी अमेरिकेतील लुईसविले, कैंटकी येथे जन्मलेले कॅसियस मार्सेलस हे पुढे जाउन जगभरात मोहम्मद अली या नावाने ओळखले जावू लागले. तीन वेळा विश्व चॅम्पियनशीप जिंकणाऱ्या अली यांनी १९६0 साली रोम आॅलिम्पिकचे सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांनी कारकिर्दीत ६१ लढती खेळल्या, त्यापैकी ५६ लढती जिंकल्या. विशेष म्हणजे त्यातील ३७ लडती नॉकआउट होत्या. बॉक्सर म्हणून यशस्वी ठरलेल्या अली यांचे कौटुंबिक जीवन मात्र तितकेसे यशस्वी झाले नाही. त्यांनी एकूण चार लग्ने केली. १७ आॅगस्ट १९६७ साली बेलिडा बोएड हिच्याशी पहिले लग्न केले. लग्नानंतर बेलिडा खलिला बनली. तिला एकूण चार अपत्ये झाली. जमिला आणि रशिदा या जुळ्या मुलीनंतर १९७२ साली त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव मोहम्मद अली ज्युनिअर असे ठेवण्यात आले. चौथ्या क्रमांकाची मुलगी मरियम ही विख्यात लेखिका आहे. मोहमद अली यांची ऐतिहासिक लढत १ आॅक्टोबर १९७५ साली फिलिपिन्समध्ये झाली होती. या लढतीबाबत प्रचंड उत्सुकता जगभर होती. संपर्काच्य सुविधा नसणाऱ्या त्या काळात वाचकांना या लढतीचा आॅँखो देखा हाल केवळ ‘लोकमत’ने दिला. ‘लोकमत’चे विद्यमान एडीटर- इन- चिफ राजेंद्र दर्डा यांचे मित्र शिवलिंगम अगोडोराई त्यावेळी हॉँगकॉँगमधील एका वृत्तपत्रात होते. दर्डा यांनी शिवलिंग यांना ट्रंककॉल लावला आणि ‘लोकमत’साठी ही लढत कव्हर करण्यास सांगितले. यासाठी शिवलिंगम तब्बल १०२८ किलोमीटरचा प्रवास करून फिलीपिन्समध्ये पोहोचले आणि या लढतीची ताजी बातमी ‘लोकमत’च्या वाचकांना देऊन एक सुखद अनुभूती दिली.मोहंमद अली यांच्या आत्म्याला शांती लाभो, अली एक आदर्श खेळाडू आणि प्रेरणास्रोत होते. त्यांनी ऊर्जा आणि दृढतेला प्रमाणित केले होते. अली यांचे शनिवारी वयाच्या ७४व्या वर्षी निधन झाले. गेल्या तीन दशकांपासून ते पार्किसन्स व्याधीने त्रस्त होते. - नरेंद्र मोदीअमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांनी महान मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांना श्रद्धांजली वाहिली. अली महान होते. आणि असे चॅम्पियन होते जे नेहमी सत्यासाठी लढले असेही ओबामा यांनी म्हटले.- बराक व मिशेल ओबामामोहंमद अली यांच्यासारखा दुसरा होणे नाही. फूलपाखरासारखे बागडणे आणि प्रतिस्पर्ध्याला मधमाशीप्रमाणे डंख मारून घायाळ करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. खासदार विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरीअल बोर्डअली एक महान मुष्टियोद्धे होते. त्यांनी मला आणि अनेक खेळाडूंना या खेळात येण्यासाठी प्रोत्साहित केले. साधारण परिवारातून आलेले अली ज्या उंचीवर पोहोचले त्यानेच त्यांना महान बनवले. बॉक्सिंगचे हे मोठे नुकसान आहे. - एम.सी. मेरी कोम, बॉक्सर्समोहंमद अली, तुम्ही नेहमी एक लिजेंड राहाल, लिजेंड कधीही मरत नाही. आम्ही तुम्हाला कायम स्मरणात ठेवू. त्यांनी बॉक्सिंगसाठी जे काही केले त्याला कधीच विसरले जाऊ शकत नाही. रिंगबाहेरील कार्यानेही ते महान बनले. - विजेंदरसिंग