हॉकी सहस्रार्जुन मुली प्रतिक्रिया

By Admin | Updated: August 28, 2014 20:55 IST2014-08-28T20:55:45+5:302014-08-28T20:55:45+5:30

मला हॉकीचा अभिमान वाटतो- शीतल मणुरे

Thousands of hockey girls react | हॉकी सहस्रार्जुन मुली प्रतिक्रिया

हॉकी सहस्रार्जुन मुली प्रतिक्रिया

ा हॉकीचा अभिमान वाटतो- शीतल मणुरे
माझ्या शाळेतील हॉकी हा प्रमुख खेळ आह़े मला शाळेतील शिक्षक व क्रीडा शिक्षकांमुळे या खेळात पुढे जाण्याची संधी मिळाली़ हॉकी हा राष्ट्रीय खेळ असल्याचा मला अभिमान वाटतो़ आज माझी राष्ट्रीय संघात निवड झाली आह़े 2012-13 मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत मी उपकर्णधारपदाचा मान मिळवला़ या स्पर्धेत आम्ही उल्लेखनीय कामगिरी केली़
हॉकीसाठी पोषक वातावरण- आरती मलजी (बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूल)
सोलापुरातील वातावरण हे हॉकीसाठी पोषक आह़े त्यामुळे यात दिवसेंदिवस मुलींचा सहभाग वाढतच आह़े क्रीडाशिक्षक म्हणून गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असून, आमच्या प्रशालेतही 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय़ आमच्या शाळेचा संघही हॉकीत चमकदार कामगिरी करीत आह़े
विद्यार्थ्यांमध्ये हॉकीबद्दल आकर्षण वाढतेय- उज्ज्वल मजली (सहस्रार्जुन प्रशाला)
आमच्या प्रशालेच्या क्रीडांगणावर जवळपास 120 मुले-मुली दररोज हॉकीचा सराव करताना दिसून येतात़ यामुळे आता हॉकीबद्दलही जागरुकता निर्माण झाली असून, याचे आकर्षणही वाढले आह़े प्रत्येक वर्षी आमच्या प्रशालेतील चार-पाच मुली राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करताना दिसून येतात़
शाळांनी राष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न करावेत: परवेज दंडू (राष्ट्रीय खेळाडू)
गेल्या 15 वर्षांपासून मी हॉकी खेळाशी संबंधित आह़े मला जरार कुरेशी यांच्याकडून हॉकीचे अनेक हातखंडे शिकावयास मिळाल़े मी अखिल भारतीय स्तरावरदेखील हॉकी खेळले आह़े सोलापूर जिल्?ात हॉकीचा प्रचार व प्रसार झपाट्याने होत आह़े त्यामुळे सोलापुरातील हॉकी जिवंत आह़े हॉकीला सुवर्ण दिवस आणण्यासाठी प्रत्येक शाळेने राष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न करावेत़

Web Title: Thousands of hockey girls react