शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संघाचा तिसरा पराभव

By admin | Updated: October 12, 2016 07:09 IST

निर्धारित वेळेत ‘चायनिज वॉल’ला रोखल्यानंतर अतिरिक्त वेळेतील शेवटच्या मिनिटाला हुआंग कॉँग याने गोल नोंदवून भारतीयांना धक्का

पणजी : निर्धारित वेळेत ‘चायनिज वॉल’ला रोखल्यानंतर अतिरिक्त वेळेतील शेवटच्या मिनिटाला हुआंग कॉँग याने गोल नोंदवून भारतीयांना धक्का दिला. याच गोलच्या बळावर चीनने भारतीयांच्या आशेलाही धक्का दिला. १७ वर्षांखालील ब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतील भारताचा हा तिसरा पराभव होता. त्यामुळे स्पर्धेत कायम राहण्याच्या आशाही धूसर झाल्या आहेत. गुणतालिकेत भारतीय संघ शून्यावर, तर चीनने पहिला विजय नोंदवून ४ गुण मिळविले आहेत. आता भारताचा साखळी फेरीतील अंतिम सामना ब्राझीलविरुद्ध बुधवारी (दि. १२) होईल. बांबोळी येथील जीएमसी मैदानावर झालेल्या या सामन्यात चीनचा बचाव आणि आघाडी भारतापेक्षा वरचढ होती. भारतीय खेळाडूंनी चीनपेक्षा अधिक वेळ चेंडूवर ताबा मिळविला. मात्र, डझनभर संधी मिळूनही त्यांना गोल करता आला नाही. २१व्या मिनिटाला भारताच्या कोमल थटालने संधी मिळविली होती; मात्र त्याचा हा फटका बचावटपटूंनी रोखला. मध्यंतराला तीन मिनिटांचा अवधी असताना अमरजितनेही संधी गमावली. ६८व्या मिनिटाला अभिजित सरकारकडे चेंडू आला होता. गोलपोस्टजवळ चीनचा बचावटूही नव्हता; मात्र त्याला गोलरक्षकाला चकवता आले नाही. ७७ आणि ७८व्या मिनिटांना भारताला सलग दोन कॉर्नर मिळाले होते. या दोन्ही कॉर्नरवर ‘चायनिज वॉल’ भेदण्यात भारत अपयशी ठरला. कर्णधार सुरेश सिंहने ही संधी वाया घालविली.८३व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर संजय स्टॅलिनने मारलेला फटका गोलपोस्टजवळून गेला आणि पुन्हा संधी हुकली. दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी वर्चस्व मिळविले होते. मात्र, त्यांना संधीचे सोने करता आले नाही. बायचुंग भूतियाची हजेरीब्रिक्स फुटबॉल स्पर्धेतील भारतासाठी ‘करा वा मरा’ अशा अवस्थेतील असलेला चीनविरुद्धचा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी कर्णधार बायचुंग भूतिया खास उपस्थित होता सामन्याआधी त्याने खेळाडूंशी संवाद साधला. भारतीय संघाची कामगिरी समाधानकारक असून, काही सुधारणा झाल्यास हा संघ अधिक मजबूत होईल, असे त्याने सांगितले.