शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धान्तला विजेतेपद

By admin | Updated: May 24, 2016 04:06 IST

महाराष्ट्राचा अव्वल मानांकित सिद्धान्त बांठियाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून राखलेला धडाका अखेरपर्यंत कायम राखताना सच्चित शर्माचा २-०ने धुव्वा उडवून १६ वर्षांखालील १०व्या रमेश देसाई राष्ट्रीय

मुंबई : महाराष्ट्राचा अव्वल मानांकित सिद्धान्त बांठियाने स्पर्धेच्या सुरुवातीपासून राखलेला धडाका अखेरपर्यंत कायम राखताना सच्चित शर्माचा २-०ने धुव्वा उडवून १६ वर्षांखालील १०व्या रमेश देसाई राष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदावर कब्जा केला. महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने मुंबईच्या डॉ. जी.ए. रानडे टेनिस संकुलात झालेल्या या स्पर्धेत सिद्धान्तने अंतिम सामन्यात धडाकेबाज खेळ करताना सच्चितला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. पहिल्याच सेटमध्ये निर्विवाद वर्चस्व राखताना सिद्धान्तने ६-१ अशी बाजी मारून सामन्यात आघाडी घेतली. यानंतर सच्चितने काही प्रमाणात प्रतिकार करताना सिद्धान्तला कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला.परंतु, तुफान फॉर्ममध्ये असलेल्या सिद्धान्तने सामन्यावरील आपली पकड न सोडता ६-३ असा विजय मिळवून स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. त्याचवेळी मुलींमध्ये तेलंगणाच्या ए. शिवानीने तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत गुजरातच्या वैदेही चौधरीचा ६-४, २-६, ७-६ असा पाडाव करून जेतेपद पटकावले. मुलांच्या दुहेरीत अमित बेनिवाल - सच्चित शर्मा यांनी बाजी मारताना रिषभ शारदा - एन. केल्वीन यांचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला. तर ए. शिवानी - शिवानी एस. यांनी मुलींचे दुहेरी जेतेपद मिळवताना प्रींकल सिंग - वैदेही यांचे आव्हान ६-१, ४-६, १०-६ असे परतावले. (क्रीडा प्रतिनिधी)