शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

संघव्यवस्थापनाने मानसिकता बदलावी

By admin | Updated: January 13, 2015 02:34 IST

विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.

नवी दिल्ली : विदेशातील दौ-यात अंतिम एकादशमध्ये गोलंदाजांची निवड करताना बीसीसीआयच्या संघव्यवस्थापनाने स्वत:च्या मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे याने म्हटले आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्ध संपलेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांची कामगिरी ढिसाळ झाली; त्यामुळे संघावर टीका झाली होती. ही टीका ग्राह्य असल्याचे सांगून कुंबळे म्हणाला, ‘‘आमच्याकडे अनेक चांगले गोलंदाज आहेत. त्यांपैकी कसोटी सामन्यात कोण सामंजस्य राखून मारा करू शकतो, हे समजण्याची गरज आहे. २० गडी बाद करू शकतील, अशा ४ सर्वश्रेष्ठ गोलंदाजांची निवड करावी. विदेशात अंतिम एकादशची निवड करताना लवचिकता आवश्यक आहे. प्रत्येक वेळी ३ वेगवान आणि १ फिरकी गोलंदाज यशस्वी होतीलच असे नाही.’’ देशासाठी कसोटी आणि वन डेत सर्वाधिक बळी घेणारा कुंबळे पुढे म्हणाला, ‘‘विमानात बसतानाच आम्ही मनात निर्धार करतो, की ३ वेगवान आणि एका फिरकीपटूची अंतिम संघात निवड करणार! ही मानसिकता योग्य नव्हे. दोन वेगवान आणि दोन फिरकीपटू २० बळी घेण्यास सक्षम असतील, तर तो फार्म्युला अमलात आणण्यास काय हरकत आहे?’’अ‍ॅडिलेड कसोटीचे उदाहरण देऊन कुंबळेने सांगितले, की सुरुवातीला येथे फलंदाजांना मदत मिळत होती, तर सामना पुढे गेल्यानंतर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरले. भारतीय संघात त्या वेळी कर्ण शर्मा हाच एकमेव फिरकीपटू होता. आॅस्ट्रेलियाचा आॅफस्पिनर नाथन लियॉन याने मालिकेत सर्वाधिक २३ बळी घेतले आहेत. वन डे क्रिकेट अधिक खेळल्यामुळे भारतीय गोलंदाज कसोटीत बळी घेण्यात अपयशी ठरत असल्याचे कुंबळेचे मत आहे. फलंदाज आपले शॉट खेळेल, असा अंदाज बांधून गोलंदाजी करणे घातक असते. वन-डे क्रिकेटमुळे ही धारणा निर्माण होते. कसोटी क्रिकेटमध्ये अनुभव लागतो. सातत्याने खेळल्यानंतरच अनुभवात भर पडते. कसोटीत दबाव बनविणे गरजेचे असते. जितका वेळ दबाव वाढवाल, तितकीच विकेट मिळण्याची अधिक शक्यता असेल, असे कुंबळेने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)> गोलंदाजीत सुधारणा आवश्यक : द्रविडभारतीय संघाची सध्या गोलंदाजांची बाजू कमकुवत आहे. जर आपली गोलंदाजी सातत्याने कमकुवत होत असेल आणि आपल्याकडे जागतिकस्तरावरील वेगवान आणि फिरकी गोलंदाज नसतील तर आपण गोलंदाजी मानांकनात नक्कीच खालच्या क्रमांकावर जाऊ. गोलंदाजीत सुधारणा करणे आवश्यक आहे. परदेशात आपण कसोटी सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशात आपण चांगली कामगिरी करतो, फलंदाजांची चांगली फौज आहे. काही फिरकी गोलंदाजसुद्धा चांगले आहेत, की जे परदेशात चांगली गोलंदाजी करू शकतील. मी मानांकनाला जास्त महत्त्व देत नाही. ते मानांकन पाचवे असो किंवा सहावे असो त्यात काही फरक पडत नाही. अधिक काळ जर आपण परदेशात खेळलो नाही तर आपल्या मानांकनात नक्कीच फरक पडणार आहे. विराटची ही सुरूवात आहे. त्याने दाखवून दिले आहे की तो कर्णधारपद सांभाळू शकतो. त्याने या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी केली हे सुद्धा महत्त्वाचे आहे, असे राहुल द्रविड शेवटी म्हणाला.