शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
5
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
6
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
7
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
8
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
9
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
10
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
11
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
12
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
13
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
14
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
15
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
19
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
20
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टी-२० विश्वकप : भारत द. आफ्रिका, विंडीजसोबत सराव सामने खेळणार

By admin | Updated: February 17, 2016 02:43 IST

मार्च महिन्यात प्रारंभ होत असलेल्या विश्वकप टी-२० स्पर्धेपूर्वी यजमान भारतीय संघ वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे.

नवी दिल्ली : मार्च महिन्यात प्रारंभ होत असलेल्या विश्वकप टी-२० स्पर्धेपूर्वी यजमान भारतीय संघ वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. भारताच्या यजमानपदाखाली आयोजित विश्वकप स्पर्धेत टीम इंडिया १० मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्ध, तर १२ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामने खेळणार आहे. विश्वकप स्पर्धेत सहभागी होत असलेल्या संघांचे पहिल्या फेरीतील सराव सामने ३ ते ६ मार्च या कालावधीत धर्मशाला व मोहाली येथे खेळल्या जाणार आहे. तर, दुसऱ्या फेरीतील लढती १० ते १५ मार्च या कालावधीत कोलकाता व मुंबई येथे सराव सामने होतील. महिला टी-२० विश्वकप स्पर्धेचे सराव सामने १० ते १४ मार्च या कालावधीत बंगळुरू व चेन्नई येथे आयोजित करण्यात येणार आहेत. भारतीय महिला संघ बंगळुरूमध्ये १० मार्च रोजी आयर्लंडविरुद्ध एकमेव सराव सामना खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुरुषांचे सराव सामने दुपारी ३ वाजता आणि सायंकाळी ७.३० वाजता प्रारंभ होणार आहेत. उपांत्य व अंतिम फेरीचे सामने सायंकाळी ७ वाजता प्रारंभ होतील. महिलांचे सामने दुपारी ३.३० वाजता प्रारंभ होतील, तर सायंकाळचे सामने ७.३० वाजता प्रारंभ होतील. > विश्वकप सराव सामन्यांचा कार्यक्रम३ मार्च - झिम्बाब्वे विरुद्ध स्थानिक संघ (धर्मशाला), आयर्लंड विरुद्ध हाँगकाँग (धर्मशाला). ४ मार्च - हॉलंड विरुद्ध स्थानिक संघ (मोहाली), ओमान विरुद्ध स्कॉटलंड (मोहाली). ५ मार्च - आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे (धर्मशाला), बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग (धर्मशाला). ६ मार्च - स्कॉटलंड विरुद्ध हॉलंड (मोहाली), अफगाणिस्तान विरुद्ध ओमान (मोहाली). १० मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (कोलकाता), न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (मुंबई). १२ मार्च - स्थानिक संघ विरुद्ध पाकिस्तान (कोलकाता), न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड (मुंबई), भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (मुंबई). १३ मार्च - आॅस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज (कोलकाता).१४ मार्च - इंग्लंड विरुद्ध स्थानिक संघ (मुंबई), पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (कोलकाता). १५ मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध स्थानिक संघ (मुंबई).अफगाणिस्तान, हाँगकाँग आणि ओमान या संघांनी आशिया कप स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली, तर सराव सामन्यांच्या कार्यक्रमात बदल होण्याची शक्यता आहे.