शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
3
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
4
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
6
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
7
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
8
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
9
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
10
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
11
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
12
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
13
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
14
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
15
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
16
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
17
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
18
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
19
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
20
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची स्वाती गाढवे प्रथम

By admin | Updated: May 16, 2016 02:31 IST

मोसिनेट गेरेमेव आणि पेरेस जेपचिरचिर यांनी आज येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड १0 के शर्यतीत अव्वल स्थान मिळवले.

बंगळूरु : तीव्र उष्णता आणि दमट वातावरणावर मात करीत मोसिनेट गेरेमेव आणि पेरेस जेपचिरचिर यांनी आज येथे झालेल्या टीसीएस वर्ल्ड १0 के शर्यतीत अव्वल स्थान मिळवले. भारतीय महिलांच्या गटात पुण्याच्या स्वाती गाढवेने पहिला क्रमांक पटकावला. दुसऱ्या क्रमांकावर नाशिकच्या संजिवनी यादवने हक्क गाजवला.स्वातीने सुरवातीपासूनच आघाडी कायम ठेवत दहा कि.मी.चे अंतर ३४.४५ मिनिटात पूर्ण केले. संजिवनीने ३६.१३ मिनिटात ही शर्यत पूर्ण केली. ३७.१८ मिनिटात शर्यत पूर्ण करणारी मिनू तिसऱ्या क्रमांकावर राहीली. ८ किलोमीटरचे अंतर गेरेमेवने ८.३६ मिनिटात पार केले. ही शर्यत त्याने दुसऱ्यांदा जिंकली आहे. ट्रॅकच्या अंतिम लॅपपर्यंत गेरेमेव केनियाच्या जॉन लँगट आणि बोंसा डिडा यांच्या मागे पडला होता. परंतु निर्णायक क्षणी एका सेकंदाने दोघांना मागे टाकून गेरेमेवने २३ हजार डॉलर्स बक्षिसावर आपला हक्क सांगितला. शर्यतीनंतर गेरेमेव म्हणाला की, यंदा तापमान जास्त असल्याने ही शर्यत थोडी अवघड होती, पण गेल्यावर्षापासूनच ही शर्यत जिंकण्याचा मला आत्मविश्वास होता. पुढच्यावर्षी मी पुन्हा येथे येईन. विश्व हाफ मॅरेथॉन चॅम्पियन केनियाच्या जेपचिरचिरने ३२.१५ मिनिटात शर्यत जिंकली. तिने आपल्याच देशाच्या हेलाह किप्रोपपेक्षा १३ सेकंदाने सरस ठरली. ती म्हणाली, तापमान जास्त होते, पहिले तीन किलोमीटर हळू पळाल्याचे घड्याळ बघितल्यावर लक्षात आले त्यानंतर मी माझी गती वाढवली.भारतीय पुरुष गटात पहिल्या आठ किलोमीटरपर्यंत गतचॅम्पियन सुरेश पटेल आघाडीवर होता. शेवटच्या एक किलोमीटरमध्ये लक्ष्मणनने जोर लावून फज्जा गाठला. त्याने ३0.३४ मिनिटाचा वेळ घेतला. आॅलिम्पिक क्चालिफायर नितेंद्रसिंह रावत तिसऱ्या स्थानावर राहीला.