शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

लीगमध्ये सुशीलला बंदी नाही : बृजभूषण

By admin | Updated: November 4, 2016 04:15 IST

दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याला प्रो-कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी कोणतीही अडचण नाही

नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याला प्रो-कुस्ती स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होण्यासाठी कोणतीही अडचण नाही, असे स्पष्टीकरण भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांनी केले आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी येथे झालेल्या फॅशन शोपूर्वी पत्रकारांशी ते बोलत होते. ब्रृजभूषण यांनी सांगितले की, सुशील गेल्या सत्रात सुरवातीला या सत्रात सहभागी झाला होता, लिलावासाठी तो तयारही झाला होता, परंतु नंतर तो लीगमधून बाहेर पडला, परंतु या सत्रामध्ये कोणावरही बंदी घालण्यात आली नसल्याचे सिंह यांनी केले. ज्याला खेळायचे आहे, त्यांनी फेडरेशनला लेखी कळवावे, त्याला सहभागी करुन घेतले जाईल. गेल्यावर्षी दुखापतीमुळे सुशीलने माघार घेतली होती, तर यंदा त्याचा नरसिंग यादव प्रकरणावरुन फेडरेशनशी वाद झाला होता. त्यामुळे त्याच्या सहभागाविषयी प्रश्नचिन्ह उठत आहे. कुस्ती लीगचे प्रमोटर प्रो स्पोर्टीफायचे संस्थापक कार्तिकेय शर्मा यांनी सांगितले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची लीग मोठी असेल. संघांची संख्या सहावरुन आठ करण्यात आली आहे. ३१ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघाला आपला आयकॉन निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. यावेळी कुस्ती सुरु असताना डगआउटमध्ये बसलेले संघ सहकारी मल्ल आणि सपोर्ट स्टाफ यांच्या हृदयाचे ठोके मोजण्यात येणार आहेत, त्यासाठी त्यांच्या शरीरावर एक चिप बसवण्यात येणार आहे. आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती मल्ल साक्षी मलिक हिने सांगितले की, या लीगमुळे आम्हाला खूप फायदा झाला. पहिल्या सत्रात एडेलिन ग्रे यांच्यासारख्या वर्ल्ड चॅम्पियन पैलवानासोबत सराव केल्यामुळे माझ्या खेळात खूपच फरक पडला. त्यामुळे दुसऱ्या सत्रासाठी मी उत्साहीत आहे. (वृत्तसंस्था)