स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी निवड

By Admin | Updated: December 15, 2014 11:29 IST2014-12-15T11:10:06+5:302014-12-15T11:29:38+5:30

स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आहे.

Steve Smith to be Australia's captain | स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी निवड

स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी निवड

ऑनलाइन लोकमत

ब्रिस्बेन, दि. १५ -  दुखापत बळावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कप्तान मायकेल क्लार्कने भारताविरुद्धच्या कसोटीतून मालिकेतून माघार घेतल्यानंतर स्टीव्ह स्मिथची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात १६२ व दुस-या डावात नाबाद ५२ धावा करणारा स्मिथ हा ऑस्ट्रेलियाचा ४५ वा आणि सर्वात तरूण कप्तान आहे. 

पाठीचे दुखणे घेऊनच पहिल्या कसोटीत खेळण्यास उतरलेल्या मायकेल क्लार्कचे दुखणे बळावल्याने तो सामन्याच्या अखेरच्या दिवशी खेळातून बाहेर पडला होता. त्याच्या वैद्यकीय चाचण्यांनतर तो मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने क्लार्कऐवजी दुसरा कर्णधार शोधण्यास सुरूवात केली होती. अखेर त्यांनी स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

Web Title: Steve Smith to be Australia's captain