शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

राज्य खो खो स्पर्धेत मुंबई उपनगर, ठाणे अजिंक्य

By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST

नशिक : महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या वतीने आयोजित ४२ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबई उपनगर, तर मुलींच्या गटात ठाणेच्या संघाने अजिंक्यपद पटकावले.

नशिक : महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या वतीने आयोजित ४२ व्या कुमार गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबई उपनगर, तर मुलींच्या गटात ठाणेच्या संघाने अजिंक्यपद पटकावले.
शहरातील विभागीय क्रीडा संकुल येथे गेल्या चार दिवसांपासून या स्पर्धा सुरू होत्या. अखेरच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे मुंबई व मुंबई उपनगर संघामध्ये अंतिम सामना रंगला. मुंबई उपनगर संघाने मुंबईवर २१-१५ अशा गुण फरकाने मात करत विजेते पदाची हॅट्ट्रिक नोंदवली.
मुलींच्या गटात अंतिम सामना अहमदनगर विरुद्ध ठाणे असा रंगला. या सामन्यात ठाणे संघाने अहमदनगर संघाचा १२-९ असा पराभव करून विजेतेपद पटकावले, तर अहमदनगर संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील विशेष खेळाडूंना उपमहापौर गुरुमित बग्गा, उद्योजक हेमंत राठी, सुरेश भटेवरा, वि. वि. करमरकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अष्टपैलू खेळाडू- अशितोष शिंदे (मुंबई), शीतल भोर (ठाणे), उत्कृष्ट संरक्षक- दुर्वेश साळुंके (मुंबई उपनगर), प्रियंका भोपी (ठाणे), उत्कृष्ट आक्रमक- संदेश महाडिक (मुंबई उपनगर), मयुरी भुत्याल (अहमदनगर) यांचा सामावेश आहे़
यावेळी व्यासपीठावर राज्य खो खो संघटनेचे कार्याध्यक्ष मंदार देशमुख, खजिनदार तुषार सुर्वे, सचिव सचिन गोडबोले, जिल्हा संघटनेचे कमलाकर कोळी, रमेश भोसले, अविनाश खैरनार, उमेश आठवणे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - 29 पीएचएसपी64 - राज्य खो खो स्पर्धेत मुलांच्या गटातील विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारताना मुंबई उपनगरचा संघ़
29पीएचएसपी65 - राज्य खो खो स्पर्धेत मुलींच्या गटातील विजेतेपदाचे पारितोषिकस्वीकारताना ठाणेचा संघ़