श्रीनिवासन पुन्हा तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष

By Admin | Updated: June 26, 2016 17:34 IST2016-06-26T17:34:42+5:302016-06-26T17:34:42+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी चेअरमन एन. श्रीनिवासन यांची १५ व्यांदा तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे.

Srinivasan again President of Tamil Nadu Cricket Association | श्रीनिवासन पुन्हा तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष

श्रीनिवासन पुन्हा तामिळनाडू क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. २६ -  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी चेअरमन एन. श्रीनिवासन यांची १५ व्यांदा तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या (टीएनसीए) अध्यक्षपदी निवड झाली आहे. 
 
शनिवारी झालेल्या टीएनसीएच्या ८६ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत श्रीनिवासन यांना अध्यक्षपदी बिनविरोध निवडण्यात आले. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन हे २००२-०३ मध्ये पहिल्यांना टीएनसीएचे अध्यक्ष निवडले गेले होते. त्या वेळी त्यांनी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एसी मुथय्या यांना पराभूत केले होते. 
 
२०१३ साळी आयपीएलमध्ये आपला जावई गुरुनाथ मयप्पनचे नाव स्पॉट फिक्सिंगमध्ये पुढे आल्यामुळे त्यांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 
 

Web Title: Srinivasan again President of Tamil Nadu Cricket Association