शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनिवासन सोडणार सुपरकिंग्जची भागीदारी ?

By admin | Updated: January 26, 2015 03:02 IST

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून निलंबनाच्या प्रक्रियेत असलेले एन. श्रीनिवासन हे आयपीएलमधील चेन्नई

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावरून निलंबनाच्या प्रक्रियेत असलेले एन. श्रीनिवासन हे आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जची भागीदारी सोडण्याच्या तयारीत आहेत. कारण, ही भागीदारी सोडल्यास ते पुन्हा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात. आयपीएल-सहामधील सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर सर्वाेच्च न्यायालयाने गेल्या गुरुवारी निकाल जाहीर केला होता. या निकालात त्यांनी श्रीनिवासन यांना ‘क्लीन चिट’ दिली असली, तरी त्यांना निवडणुकीसाठी बीसीसीआय आणि आयपीएल यांच्यापैकी एकाचीच निवड करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे, तर आगामी सहा महिन्यांत अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्यात याव्या, असेही न्यायालयाने सांगितले आहे.प्रसारमाध्यमांमधील रिपोर्टनुसार, श्रीनिवासन हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढण्याच्या विचारात आहेत. यासाठी त्यांना आयपीएलमध्ये कोणतीही भागीदारी ठेवता येणार नाही. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट या कंपनीकडेच चेन्नई सुपरकिंग्ज संघाची मालकी आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जची भागीदारी सोडण्याचा विचार केला आहे. असे झाल्यास त्यांची इंडिया सिमेंट ही कंपनी चेन्नई सुपरकिंग्जपासून वेगळी होईल. कारण, न्यायालयाच्या आदेशानुसार कोणताही व्यक्ती जी बीसीसीआयचा सदस्य किंवा आयपीएल फ्रेन्चायझी आहे, ती आयपीएल सामन्यांसाठी गुंतवणूकदार बनू शकत नाही.दरम्यान, न्यायालयाने श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन तसेच राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांना सट्टेबाजी प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून दोषी ठरविले आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या दोन्ही संघांवर कारवाई व्हावी, यासाठी सर्वाेच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती सहा महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. (वृत्तसंस्था)