शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडू आरक्षणाच्या प्रमाणपत्रासाठी क्रीडा विभागाची दुकानदारी

By admin | Updated: December 18, 2014 05:10 IST

खेळाडूंना सुरक्षित नोकरीची हमी मिळून त्यांचा जास्तीत जास्त वेळ खेळामधील कौशल्य मिळविण्यासाठी देता यावा

शिवाजी गोरे, पुणे
खेळाडूंना सुरक्षित नोकरीची हमी मिळून त्यांचा जास्तीत जास्त वेळ खेळामधील कौशल्य मिळविण्यासाठी देता यावा, या हेतूने सुरू केलेल्या पाच टक्के खेळाडू आरक्षणासाठी क्रीडा विभागातूनच दुकानदारी सुरू आहे. क्रीडा विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या ‘अर्थपूर्ण’ मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर या खेळाडूंवर वणवण भटकण्याची वेळ येत आहे. तायक्वांदोमध्ये राज्य पातळीवर पदके मिळवीत राष्ट्रीय पातळीवर खेळण्याची जिद्द बाळगणारा पृथ्वीराज फडतरे हा खेळाडू क्रीडाविभागाकडून ‘गहाळ’ झालेली प्रमाणपत्रे शोधण्यासाठी वणवण भटकत आहे.
फडतरे या खेळाडूची ही प्रातिनिधिक कथा. लालफितशाहीमध्ये क्रीडा विभागातील सर्वाधिक महत्त्वाचा असलेला खेळाडू हाच घटक किती दुर्लक्षित आहे, हे दाखविणारी. सातारा जिल्ह्यातील वडूज गावचा असलेल्या पृथ्वीराजची हातातोंडाशी आलेली एक नोकरी तर गेली आहे. तर, दुसऱ्या नोकरीसाठी २०१० पासून आत्तापर्यंत किमान ३० ते ३५ वेळा चकरा माराव्या लागल्या आहेत. आता तर त्याला क्रीडा विभागाकडून सांगण्यात आले आहे, की, तुझी तीन प्रमाणपत्रे गहाळ झाली आहेत. तू दिलेल्या फाइलमध्ये नाहीत.
पृथ्वीराजने शासनाच्या खेळाडू प्रवर्गात ५ टक्के आरक्षण अंतर्गत नोकरीसाठी पहिला अर्ज नवी मुंबई पोलीस खात्यात २०१०मध्ये केला होता. २० डिसेंबर २०१० मध्ये नेमणुकीचे पत्र आले. क्रीडा संचालनालयाने त्याची सर्व प्रमाणपत्रे मागविली. ती जुलै २०११मध्ये प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविले. तोपर्यंत नवी मुंबई पोलीस खात्याने प्रमाणपत्राची पडताळणीची कागदपत्रे क्रीडा खात्याकडून वेळेवर न आल्यामुळे पृथ्वीराजच्या जागी दुसऱ्याचे नाव दाखल केले. त्यामुळे त्याची नोकरी गेली.
पृथ्वीराजने २०१४ मध्ये ठाणे पोलीस दलात नोकरीसाठी अर्ज केला. आॅगस्ट २०१४मध्ये त्याला नेमणुकीचे पत्र मिळाले. आॅगस्टमध्ये त्याची प्रमाणपत्रे क्रीडा खात्याकडे पडताळणीसाठी आली. येरवडा येथील क्रीडा विभागाच्या कार्यालयात त्याला मूळ प्रमाणपत्र (मेरिट सर्टिफिकीट) मागण्यात आले. मागील पडताळणीच्या वेळीच ही प्रमाणपत्रे दिली असल्याचे त्याने सांगितले. ती नवी मुंबईला पाठविली असल्याचे त्याला सांगण्यात आले. नवी मुंबई पोलीस कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्यांनी मूळ प्रमाणपत्रे आले नसल्याचे सांगितले गेले. पुन्हा येरवडा कार्यालयात गेल्यावर त्याला क्रीडा आयुक्तालयात पाठविण्यात आले.
कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या नोकरीप्रमाणे हीसुद्धा नोकरी हातची जाऊ नये म्हणून त्याने क्रीडा खात्याच्या अधिकाऱ्यांना लवकर काम करण्याची विनंती केली. तुझी मूळ प्रमाणपत्रे आणून दे, असे सांगितल्यावर पृथ्वीराजला धक्काच बसला. प्रमाणपत्रे तुमच्याकडेच आहेत, असे त्याने सांगितले. ती आता आम्हाला शोधावी लागतील. पृथ्वीराजला आता काय करावे, हेच सुचेनासे झाले आहे. त्याच्याकडे प्रमाणपत्र व कागदपत्र मिळाल्याची पोहोचपावतीसुद्धा आहे.