शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा रचला इतिहास

By admin | Updated: October 7, 2016 02:39 IST

डेव्हिड मिलर (नाबाद ११८) व क्वांटन डिकॉक (७०) यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाच्या ३७२ धावांचे आव्हान सहज पेलले

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यांदा रचला इतिहासदरबन : डेव्हिड मिलर (नाबाद ११८) व क्वांटन डिकॉक (७०) यांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने आॅस्ट्रेलियाच्या ३७२ धावांचे आव्हान सहज पेलले. आफ्रिकेने ४ गडी राखून विजय संपादन करून इतिहासातील दुसरा मोठा विजय साकारला.किग्समीड मैदानावर दिवस-रात्र एकदिवसीय सामन्यात आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. डेव्हिड वॉर्नर (११७), कर्णधार स्टीव्हन स्मिथ (१०८) व अ‍ॅरॉन फिंच (५३) यांच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने निर्धारित ५० षटकांत ३७१ धावांचा डोंगर उभारला. दक्षिण आफ्रिकेकडून डेल स्टेन व इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले.आॅस्ट्रेलियाच्या ३७१ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या फलंदाजांनीही चौकार, षटकारांची आतषबाजी केली. आफ्रिकेने ४९.२ षटकांत ६ गड्यांच्या मोबदल्यात ३७२ धावा करून एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील दुसरा मोठा विजय संपादन केला. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने (नाबाद ११८), क्वांटन डिकॉकने (७०), हशिम आमलाने (४५) तर एंडिले फेहलुकवायो याने (नाबाद ४२) धावा केल्या. मिलरने ७९ चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांची बरसात केली.दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी १२ मार्च २००६ रोजी जोहान्सबर्गमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४३४ धावांचा पाठलाग करताना ४३८ धावा करून विजय मिळविला होता.संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया : ५० षटकांत ६ बाद ३७१ (डेव्हिड वॉर्नर झे. ड्युमिनी गो. ताहीर ११७, अ‍ॅरॉन फिंच झे. रबाडा गो. ताहीर ५३, स्मिथ त्रिफळा गो. स्टेन १०८, जॉर्ज बेली झे. ड्युप्लेसिस गो. फेहलुकवायो २८, टी.एम. हेड झे. गो. रबाडा ३५, डेल स्टेन २/९६, ताहीर २/५४, रबाडा १/८६).दक्षिण आफ्रिका : ४९.२ षटकांत ६ बाद ३७२ (डिकॉक झे. वॉरल्ल गो. ट्रीमेन ७०, हशिम आमला पायचित हेस्टिंग्ज ४५, डेव्हिड मिलर नाबाद ११८ ,फेहलुकवायो नाबाद ४२, हेस्टिंग्ज २/७९, ट्रीमेन १/६५, मार्श १/६१, झम्पा १/५५, हेड १/३१).