शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुलगा ग्रॅण्डमास्टर तर वडील आंतरराष्ट्रीय आर्बिटर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 18:29 IST

म्हामल कुटुंबीयांची बुद्धिबळात झेप : अरविंद यांच्याकडून फिडेचा ‘आयए’ नॉर्म पूर्ण 

सचिन कोरडे, पणजी : घरात बुद्धिबळाचे वातावरण. त्याचा फायदा मुलाला झाला. मुलाने वडिलांकडून प्रोत्साहन घेत बुद्धिबळाच्या चाली शिकल्या. पुढे त्याने स्पर्धा जिंकण्याचा सपाटा लावला. पाहता पाहता तो गोव्यातील पहिला ग्रॅण्डमास्टर बनला. आता त्याच मुलाच्या म्हणजे अनुराग म्हामल याच्या वडिलांनीही बुद्धिबळात झेप घेतलीय. फरक एवढाच की, त्यांची ही कामगिरी पटाबाहेरची आहे. राज्याचे आघाडीचे आर्बिटर असलेले अरविंद आता आंतरराष्ट्रीय आर्बिटर बनले आहेत. अशी कामगिरी करणारे ते एकमेव गोमंतकीय आहेत, हे विशेष.अरविंद यांना बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या ‘फिडे’कडून हा मान प्राप्त झालाय. त्यांना ७ ते ८ सप्टेंबर रोजी बुडापेस्ट (हंगेरी) येथे झालेल्या स्पर्धेवेळी हा गौरव प्रदान करण्यात आला. अरविंद यांनी आपला नॉर्म २०१५ मध्ये राष्ट्रीय टीम चॅम्पियनशीप, पहिली गोवा आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धा २०१८, मुंबई येथील १२ वी मेयर्स आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धा आणि दुसºया गोवा आंतरराष्ट्रीय ओपन बुद्धिबळ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर पूर्ण केला.अरविंद यांनी एक बुद्धिबळपटू म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. ते राज्यातील विविध स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य भाग होते. गेल्या २५ वर्षांपासून त्यांनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात प्रमुख भूमिका घेतली आहे. या स्पर्धांत त्यांनी आर्बिटर म्हणून दिलेले योगदान उल्लेखनीय ठरले आहे. अरविंद हे बांबोळी चेस क्लबचे माजी अध्यक्ष आहेत. तसेच ते गोवा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव सुद्धा होते. सध्या ते तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रीय आर्बिटर म्हणून सुरुवात केल्यानंतर त्यांना फिडे आर्बिटरचा मान प्राप्त झाला होता. त्यानंतर त्यांनी फिडेचा सर्वाेच्च मान असलेला आंतरराष्ट्रीय आर्बिटर हा किताब मिळवला आहे. दरम्यान, अरविंद यांच्या कामगिरीबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर, महेश कांदोळकर, दत्ताराम पिंगे, संजय बेलूरकर यांनी अभिनंदन केले. "मी जवळपास ३० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आर्बिटर म्हणून काम केले. गेल्या दोन वर्षांपासून प्रमुख आर्बिटर म्हणून काम पाहत होतो. एक आवड आणि छंद असल्याने मी बुद्धिबळापासून दूर जाऊ शकलो नाही. आंतराष्ट्रीय आर्बिटर बनता येईल, असे मित्रांकडून सांगण्यात येत होते. तसा प्रयत्न केला आणि यश मिळाले. हा किताब मिळाल्याबद्दल मला समाधान वाटते. आता राज्यातील आर्बिटरची संख्या वाढावी अशी इच्छा आहे. त्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करीन,"असे अरविंद म्हामल यांनी सांगितले.

टॅग्स :Chessबुद्धीबळgoaगोवा