सिंधू, प्रणयचे संघर्षपूर्ण विजय

By Admin | Updated: November 28, 2014 01:30 IST2014-11-28T01:30:55+5:302014-11-28T01:30:55+5:30

भारताच्या सिंधूने इंडोनेशियाच्या लिंडावेना फेनेत्रीचा एक तास पाच मिनिटे चाललेल्या लढतीत 21-16, 16-21, 21-19 असा पराभव केला.

Sindhu, Praney's struggling triumph | सिंधू, प्रणयचे संघर्षपूर्ण विजय

सिंधू, प्रणयचे संघर्षपूर्ण विजय

मकाऊ : दुसरी मानांकितप्राप्त भारताची पी. व्ही. सिंधू आणि तिसरा मानांकित असलेला एच. एस. प्रणय यांनी अनुक्रमे लिंडावेना फेनेत्री व लिन यू सिएन यांचा संघर्षपूर्ण पराभव करून मकाऊ ग्रां.प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे भारताच्या बी. साई प्रणितला पराभवाचा सामना करावा लागला. 
भारताच्या सिंधूने इंडोनेशियाच्या लिंडावेना फेनेत्रीचा एक तास पाच मिनिटे चाललेल्या लढतीत 21-16, 16-21, 21-19 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत 11 व्या क्रमांकावर असलेल्या सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीतील सामना 17 वी मानांकित चीनची हांग लीविरुद्ध होईल. दुसरीकडे एच. एस. प्रणयने चिनी तैपईच्या लिन यू सिएनला 56 मिनिटांत 17-21, 21-19, 21-14 असे नमवत घरचा रस्ता दाखविला. (वृत्तसंस्था)
पुरुषांच्या दुस:या लढतीत भारताच्या बी. साई प्रणितला 13 व्या मानांकित इंडोनेशियाच्या सोनी द्वी कुनकोरोकडून एक तास सात मिनिटे झालेल्या लढतीत 21-16, 19-21, 21-17 असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था) 

 

Web Title: Sindhu, Praney's struggling triumph