शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाची सव्याज परतफेड करू : वॉटसन

By admin | Updated: December 8, 2014 01:03 IST

आॅस्ट्रेलियन संघ अजूनही फिलिप ह्युज याच्या निधनाच्या दु:खातून सावरला नसला, तरी अष्टपैलू शेन वॉटसन याने आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत आक्रमक खेळ करून

अ‍ॅडिलेड : आॅस्ट्रेलियन संघ अजूनही फिलिप ह्युज याच्या निधनाच्या दु:खातून सावरला नसला, तरी अष्टपैलू शेन वॉटसन याने आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत आक्रमक खेळ करून भारताला नमविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. या ३३ वर्षीय खेळाडूने सांगितले की, गत आठवडा संघासाठी आव्हानात्मक होता. मात्र, संघ पूर्वीसारखा आक्रमक खेळ करणार आहे आणि गतवर्षी भारताकडून मिळालेल्या ०-४ असा पराभवाची सव्याज परतफेड करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही.
येथील पत्रकार परिषदेत तो म्हणाला, आक्रमक खेळ केल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करण्यात संघाला यश मिळते. मी आॅस्ट्रेलियन संघात खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच मी पाहत आलोय. फलंदाजी आणि गोलंदाजीत आम्ही आक्रमकता दाखविणार. विशेषकरून गत अ‍ॅशेज मालिकेत आमच्या गोलंदाजांनी आक्रमकता दाखविली होती, तीच या मालिकेतही दिसेल. यात कोणताही बदल नसेल.
भारताने २०१३ मध्ये घरच्या मैदानावर आॅस्ट्रेलियाचा ४-० असा फडशा पाडला होता. याआधी २०११-१२ मध्ये आॅस्ट्रेलियाने त्यांच्या घरी भारताची अशीच दयनीय अवस्था केली होती. आॅस्ट्रेलियन संघाने शुक्रवारपासून सरावास सुरुवात केली. संघातील बहुतेक खेळाडू अजूनही ह्युजच्या निधनाच्या दु:खातून बाहेर पडलेले नाहीत. वॉटसन म्हणाला, शारीरिकदृष्ट्या तयार असलो, तरी मानसिकदृष्ट्या हळूहळू क्रिकेटकडे वळत आहे. गेले दोन दिवस हे मानसिकदृष्ट्या माझ्या कारकिर्दीतील सर्वांत आव्हानात्मक होते. त्याक्षणी मी एससीजी येथे उपस्थित होतो, परंतु मंगळवारपर्यंत कमबॅक करेन.
या मालिकेत आॅस्ट्रेलियाचे सर्व अव्वल खेळाडू खेळतील का, या प्रश्नावर वॉटसन म्हणाला, हो मला विश्वास आहे. सर्व या दु:खातून बाहेर पडले आहेत. काही खेळाडू इतरांच्या तुलनेत अजूनही सदम्यात आहेत. (वृत्तसंस्था)