जिल्हास्तरीय चॉकबॉल स्पधेत शिवाजीचे वर्चस्व

By Admin | Updated: December 8, 2015 01:51 IST2015-12-08T01:51:50+5:302015-12-08T01:51:50+5:30

सोलापूर: सोलापूर शहर व जिल्हा चॉकबॉल असोसिएशन व छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय चॉकबॉल स्पर्धेत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाने विजेतेपद पटकावल़े या स्पर्धेतून 11 ते 13 डिसेंबर रोजी अमरावती येथे होणार्‍या राज्यस्तरीय वरिष्ठ चॉकबॉल स्पर्धेसाठी संघ निवडण्यात आला़ या संघाचे सराव शिबीर 7 ते 10 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या मैदानावर होत आह़े अंतिम संघ 10 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आह़े

Shivaji's supremacy in district level chalkball competition | जिल्हास्तरीय चॉकबॉल स्पधेत शिवाजीचे वर्चस्व

जिल्हास्तरीय चॉकबॉल स्पधेत शिवाजीचे वर्चस्व

लापूर: सोलापूर शहर व जिल्हा चॉकबॉल असोसिएशन व छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय यांच्या विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय चॉकबॉल स्पर्धेत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाने विजेतेपद पटकावल़े या स्पर्धेतून 11 ते 13 डिसेंबर रोजी अमरावती येथे होणार्‍या राज्यस्तरीय वरिष्ठ चॉकबॉल स्पर्धेसाठी संघ निवडण्यात आला़ या संघाचे सराव शिबीर 7 ते 10 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या मैदानावर होत आह़े अंतिम संघ 10 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आह़े
या स्पर्धेचे उद्घाटन श्याम पाटील यांच्या हस्ते झाल़े यावेळी नागेश भिंगारे उपस्थित होत़े बक्षीस वितरण संघटनेचे अध्यक्ष भारत जाधव, मंगेश पवार यांच्या हस्ते झाल़े यावेळी कार्याध्यक्ष संतोष गवळी, सचिन गायकवाड, मारुती घोडके, संतोष खेंडे, प्रशांत कदम, अमोल चव्हाण, अक्षय गवळी उपस्थित होत़े
या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू जिशान शेख याला 501 रुपयांचे बक्षीस प्रमोद चुंगे यांच्या हस्ते देण्यात आल़े
या स्पर्धेत हरिभाई देवकरण, आसावा प्रशाला, छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, स?ाद्री प्रशाला, सिंदखेडच्या डॉ भै़वळसंगकर प्रशाला या संघांनी भाग घेतला होता़ या स्पर्धेचे नियोजन सचिव शिवाजी वसपटे यांनी केल़े
पुरुष गटातील विजयी संघ: छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय, हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय
यासाठी प्रथमेश हाक्के, शोएब पटेल यांनी पर्शिम घेतल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटोओळी-
जिल्हास्तरीय चॉकबॉल स्पर्धेतील विजयी संघाला चषक प्रदान करताना अध्यक्ष भारत जाधव, मंगेश पवार, संतोष खेंडे, शिवाजी वसपटे, अक्षय गवळी़

Web Title: Shivaji's supremacy in district level chalkball competition