शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिखर धवनची ‘दीड शतकी’ खेळी

By admin | Updated: June 11, 2015 01:08 IST

शिखर धवनची दीड शतकी (१५० धावा) खेळी, तसेच मुरली विजयसह सलामीला केलेल्या नाबाद २३९ धावांच्या भागीदारीमुळे भारताने बांगलादेशविरुद्ध एकमेव

फतुल्लाह : शिखर धवनची दीड शतकी (१५० धावा) खेळी, तसेच मुरली विजयसह सलामीला केलेल्या नाबाद २३९ धावांच्या भागीदारीमुळे भारताने बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययातही पकड घट्ट केली. सिडनी कसोटीत शतक ठोकणारा लोकेश राहुल आजारी पडल्यानंतर मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेत धवनने १३४ चेंडू टोलवीत १९ चौकारांसह नाबाद १५० धावा ठोकल्या. विजयनेदेखील त्याला साथ देत १७९ चेंडूंत नाबाद ८५ धावा केल्या. ५६ षटकांच्या खेळात भारतीय फलंदाजांना कुठलाही अडसर आला नाही. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्यानंतर धवन- विजय यांनी दुसऱ्यांदा २०० धावांची भागीदारी केली. याआधी दोघांनी २०१३ मध्ये मोहालीत २८९ धावा ठोकल्या होत्या. या दोघांनी आज सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चोपून काढण्याचे तंत्र अवलंबले. विकेट काहीशी मंद आणि पाटा होती. त्यावर यजमान फिरकी गोलंदाजांनादेखील फारसे यश मिळू शकले नाही. धवनला २४ व्या षटकांत पावसाने हजेरी लावण्याआधी जीवदान मिळाले. फिरकी गोलंदाज तैजुलच्या चेंडूवर शुवागताने शॉर्ट मिडविकेटवर त्याचा झेल सोडला.त्या वेळी धवन ७३ धावांवर खेळत होता.पावसामुळे जवळपास चार तासांचा खेळ वाया गेला. खेळ सुरू होताच दोन्ही फलंदाज पुन्हा फॉर्ममध्ये दिसले. विजयने वेगवान शाहीदच्या चेंडूूूवर षटकार खेचून अर्धशतक गाठले. धवननेही झुबेरला चौकार ठोकून स्वत:चे तिसरे शतक पूर्ण केले. यजमान संघाने चार तज्ज्ञ फिरकीपटू आणि एकमेव वेगवान गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय घेतला, पण धवन- विजय यांचा झंझावात थोपविण्यात अपयश आल्याने बांगलादेशचा निर्णय चुकल्याचे स्पष्ट झाले. धवन फटकेबाजी करीत असताना विजयने त्याला एकेक धावा घेत संधी देण्याचे धोरण अवलंबले होते. मुख्य फिरकी गोलंदाज साकिब हा फारसा प्रभावी जाणवत नव्हता. याशिवाय सर्वांत वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन याला बाहेर बसविणे संघ व्यवस्थापनाला महागात पडले. अंतिम एकादशमध्ये असलेला एकमेव वेगवान गोलंदाज शाहीदने ५२ धावा मोजल्या, पण त्याला गडी बाद करता आला नाही. भारताच्या सलामी जोडीला त्रस्त करून सोडणारा वेग आणि विविधता त्याच्या चेंडूत मुळीच जाणवत नव्हती. (वृत्तसंस्था)