शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

शमी व यादव यांच्या कामगिरीची साथ मिळाली

By admin | Updated: March 10, 2015 01:39 IST

विश्वकप स्पर्धेत नव्या चेंडूने मारा करणारे भारतीय गोलंदाज मोहंमद शमी आणि उमेश यादव यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यामुळे मला लाभ मिळाला

हॅमिल्टन : विश्वकप स्पर्धेत नव्या चेंडूने मारा करणारे भारतीय गोलंदाज मोहंमद शमी आणि उमेश यादव यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यामुळे मला लाभ मिळाला, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने व्यक्त केली. माझ्या यशाचे श्रेय शमी व यादव यांना जाते, असेही मोहीत म्हणाला. मोहीतने चार सामन्यांत ६ बळी घेतले. त्याने प्रतिषटक ३.९० च्या सरासरीने धावा दिल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये त्याने सर्वांत कमी सरासरीने धावा दिलेल्या आहेत. आयर्लंडविरुद्ध मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना मोहित म्हणाला, ‘‘शमी व उमेश यांच्या कामगिरीमुळे मला मदत मिळत आहे. ते चांगली गोलंदाजी करीत असून प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यात यशस्वी ठरले आहेत. माझे काम दडपण कायम राखण्याचे आहे. त्यामुळे आश्विन व जडेजाला लाभ घेता येईल, अशी योजना असते. फलंदाज सुरुवातीपासून दडपणाखाली असल्यामुळे मला लाभ मिळत आहे. माझे काम केवळ क्षमतेनुसार गोलंदाजी करण्याचे आहे.’’मोहित म्हणाला, ‘‘चांगल्या कामगिरीला कुठली मर्यादा नसते. आम्हाला अद्याप स्लॉग ओव्हर्समध्ये गोलंदाजी करावी लागलेली नाही, हे विसरता येणार नाही. सेडन पार्क मैदान अ‍ॅडलेड ओव्हल, एमसीजी आणि वाका या मैदानांच्या तुलनेत लहान असल्यामुळे गोलंदाजी करताना चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करावा लागेल. मोठ्या व लहान मैदानात खेळताना फरक जाणवतो. मैदानाच्या आकाराचा विचार न करता गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करणे आवश्यक ठरते. उभय संघांसाठी सारखीच परिस्थिती आहे. आपल्या शक्तीस्थळांचा विचार करीत सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत.’’इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे संधी मिळालेला मोहीत म्हणाला, ‘‘तिरंगी मालिकेत पर्थमध्ये खेळल्याचा लाभ मिळाला. तिरंगी मालिकेदरम्यान येथील वातावरणासोबत समरस होण्याची संधी मिळाली.’’ (वृत्तसंस्था)