शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
2
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
3
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
4
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
7
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
8
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
10
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
11
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
12
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
13
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
14
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
15
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
16
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
17
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
18
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा लाजिरवाणा पराभव, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे गालबोट

By admin | Updated: October 6, 2015 01:40 IST

भारतीय फलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्याला गालबोट लागले. या लढतीत द. आफ्रिकेने टीम इंडियावर ६ विकेट

कटक : भारतीय फलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्याला गालबोट लागले. या लढतीत द. आफ्रिकेने टीम इंडियावर ६ विकेट व १७ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली.
बाराबत्ती स्टेडियमच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेकीचा कौल मिळवीत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
त्यांनी १७.२ षटकांत ९२ धावा केल्या. भारतीय संघाची द. आफ्रिकेविरुद्धची ही नीचांकी धावसंख्या आहे.
द. आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सने १९, डिफाफ डू प्लेसिसने १६, जे पी ड्युमिनीने नाबाद ३० करून भारताने दिलेले ९३ धावांचे आव्हान १७.१ षटकांत ४ बाद ९६ धावा करीत पूर्ण केले.
तत्पूर्वी, भारतीय संघाकडून रोहित शर्मा २२, शिखर धवन ११, सुरेश रैना २२, आर. आश्विन ११ हेच फक्त दुहेरी धावसंख्या गाठू शकले. अ‍ॅल्बी मॉर्केलने ४ षटकांत १२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. लेगस्पिनर इम्रान ताहिरने चार षटकांत २४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. मॉर्केलने कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५), अक्षर पटेल (९) आणि भुवनेश्वर कुमार (०) यांना माघारी परतवले. ताहिरने रैना (२२), हरभजनसिंगला (०) एकापाठोपाठ माघारी परतवले. मॉरिसने २.२ षटकांत १६ धावांच्या मोबदल्यात शिखर धवन (११) आणि रविचंद्रन आश्विन यांना बाद केले. (वृत्तसंस्था)

धावफलक
भारत : रोहित शर्मा धावबाद २२, शिखर धवन पायचित गो. मॉरिस ११, विराट कोहली धावबाद ०१, सुरेश रैना झे. अमला गो. ताहिर २२, अंबाती रायडू त्रि. गो. रबादा ००, महेंद्रसिंह धोनी झे. डीव्हिलियर्स गो. मॉर्केल ०५, अक्षर पटेल झे. प्लेसिस गो. मॉर्केल ०९, रविचंद्रन आश्विन त्रि. गो. मॉरिस ११, भुवनेश्वर कुमार त्रि. गो. मॉर्केल ००, मोहित शर्मा नाबाद ००. अवांतर (११). एकूण : १७.२ षटकांत सर्व बाद ९२. गोलंदाजी : केली एबोट ३-०-२१-०, इम्रान ताहिर ४-०-२४-२, के. रबादा ४-०-१८-१, मॉरिस २.२-०-१६-२, मॉर्केल ४-०-१२-३.
द. आफ्रिका : एबी डिव्हिलीयर्स त्रि. गो. आश्विन १९, हाशिम आमला झे. शर्मा गो. आश्विन २, फाफ डू प्लेसिस झे. मोहित शर्मा गो. आश्विन १६, जेपी ड्युमिनी नाबाद ३०, फरहान बेहार्डिन पायचित गो. पटेल ११, डेव्हिड मिलर नाबाद १०; अवांतर ८; एकूण १७.१ षटकांत ४ बाद ९६. गोलंदाजी : आर. आश्विन ३/२४, अक्षर पटेल १/१७.