सेरेना दिग्गजांना देणार धक्का

By Admin | Updated: January 16, 2017 05:24 IST2017-01-16T05:24:25+5:302017-01-16T05:24:25+5:30

सेरेना विलियम्सनने रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित एंजेलिक कर्बरसह दिग्गज खेळाडूंना धक्का देण्यासाठी कंबर कसली

Serena will push the giants | सेरेना दिग्गजांना देणार धक्का

सेरेना दिग्गजांना देणार धक्का

मेलर्बन-  सेरेना विलियम्सनने रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित एंजेलिक कर्बरसह दिग्गज खेळाडूंना धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकाविण्याच्या निर्धाराने येथे दाखल झाली असल्याचे सेरेनाने म्हटले आहे. सेरेना विक्रमी २३ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविण्यासाठी उत्सुक आहे. सेरेनाला पहिल्या फेरीत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सेरेना बेनिसिचला पराभूत करण्यात यशस्वी ठरली, तर उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ फॉर्मात असेलल्या ब्रिटनच्या जोहाना कोंटा किंवा सहावे मानांकन प्राप्त डोमिनिका सिबुलकोव्हा यांच्यापैकी एकीसोबत पडण्याची शक्यता आहे.
जर्मनीच्या कर्बरची सेरेनासोबत अंतिम फेरीत गाठ पडू शकते. कर्बरने गेल्या वर्षी मेलबोर्नमध्ये सेरेनाचा पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदविला होता. कर्बरने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रथमच विजेतेपद पटकाविले होते. त्यानंतर कर्बरनने अमेरिकन ओपन स्पर्धेतही जेतेपद पटकाविले होते. त्यात सेरेनाला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.

Web Title: Serena will push the giants