शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत स़हि़ऩे प्रशालेला विजेतेपद

By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:34+5:302015-09-07T23:27:34+5:30

सोलापूर: शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेने 17 वर्षांखालील वयोगटात विजेतेपद पटकावल़े

The school won the school title in the Ballabhadintan competition | शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत स़हि़ऩे प्रशालेला विजेतेपद

शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत स़हि़ऩे प्रशालेला विजेतेपद

लापूर: शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत सकुबाई हिराचंद नेमचंद प्रशालेने 17 वर्षांखालील वयोगटात विजेतेपद पटकावल़े
शिवस्मारक क्रीडांगणावर खेळविण्यात आलेल्या चुरशीच्या अंतिम सामन्यात सहिने प्रशालेने सुरवसे प्रशालेचा 2-0 सेटने पराभव केला़ पहिल्या सेटमध्ये सहिनेने 25-19 असा पराभव केला़ दुसर्‍या सेटमध्ये सहिनेने 28-25 असा विजय मिळवला़ सहिनेकडून स्वप्निल कोळी, स्वप्निल क्षीरसागर, विशाल बनसोडे, योगिराज शेंद्रे, सौरभ बिराजदार यांनी अष्टपैलू खेळी केली़ सुरवसे प्रशालेकडून हर्षल कुसुमडे, रणविजय काटंबे, म़ रफिक सय्यद, विनायक रेड्डी, निहाल मुलाणी यांनी सुरेख खेळाचे प्रदर्शन केल़े
विजयी खेळाडूंना क्रीडाविभाग प्रमुख वीरेश अंगडी, क्रीडा शिक्षक मुकुंद गिरी, अविराज गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे सरस्वती संस्थेचे अध्यक्ष मोहन दाते, कार्यवाह अँड़ रघुनाथ दामले, मुख्याध्यापक धनंजय जोशी, उपमुख्याध्यापिका पद्मा माशाळ, पर्यवेक्षिका कल्पना झाडबुके यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)
फोटो ओळी-
शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेत 17 वर्षे वयोगटात विजेतेपद पटकावलेल्या सहिने प्रशालेच्या खेळाडूंसोबत वीरेश अंगडी, मुख्याध्यापक धनंजय जोशी, अविराज गायकवाड़

Web Title: The school won the school title in the Ballabhadintan competition