शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शालेय ‘आॅलिम्पिक’ स्पर्धा रंगणार

By admin | Updated: November 5, 2015 23:32 IST

कोणत्याही खेळाडूच्या यशस्वी कारकिर्दीचा शालेय स्पर्धा पाया असतो. या स्पर्धांमधूनच प्रत्येक खेळाडू घडत जातो. त्यामुळेच प्रत्येक शालेय खेळाडूला उच्चस्तरीय स्पर्धांद्वारे स्वत:ला

मुंबई : कोणत्याही खेळाडूच्या यशस्वी कारकिर्दीचा शालेय स्पर्धा पाया असतो. या स्पर्धांमधूनच प्रत्येक खेळाडू घडत जातो. त्यामुळेच प्रत्येक शालेय खेळाडूला उच्चस्तरीय स्पर्धांद्वारे स्वत:ला आजमवण्याची संधी मिळावी, यासाठी डॉ. डीवाय स्पोटर््स अ‍ॅकॅडमी आणि स्पोटर््स फॉर आॅल यांच्या संयुक्त विद्यमानाने आगामी डिसेंबर महिन्यात आंतर शालेय क्रीडा स्पर्धेचा धमाका आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ‘अब जितेगा इंडिया’ असे म्हणत टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्माची मदत या उपक्रमाला मिळणार आहे.एकूण नऊ खेळांचे सामने या स्पर्धेत होणार असून, यामध्ये स्क्वॉश, टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल, टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, हँडबॉल आणि ज्युडो या खेळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे विविध वयोगटात रंगणाऱ्या या स्पर्धेत कोणत्याही शाळेचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे ही स्पर्धा प्रत्येक शालेय खेळाडूसाठी सुवर्णसंधी असेल.नेरुळ येथील डॉ. डीवाय स्पोटर््स अ‍ॅकेडमीमध्ये २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान पार पडणाऱ्या या स्पर्धेसाठी आतापर्यंत ५० हून अधिक शाळांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे, या स्पर्धेचे शुल्क भरणे कोणत्या शाळेसाठी शक्य नसेल, तर त्या शाळेचे पूर्ण शुल्क रोहित शर्मा स्वत: भरणार आहे. स्पर्धेत सहभाग निश्चित करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर आहे. या स्पर्धेत प्रत्येक सामन्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करून ते खेळाडूंना किंवा त्यांच्या संघांना देण्यात येणार आहे, तसेच आठ दिवसांच्या या आंतर शालेय क्रीडा स्पर्धेदरम्यान क्रीडा प्रशिक्षक व शालेय क्रीडा शिक्षक यांच्यासाठी विशेष शिबिराचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.