शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

सायना, श्रीकांतला कठीण ड्रॉ

By admin | Updated: December 17, 2014 01:26 IST

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, के.श्रीकांत उद्या, बुधवारपासून सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व सुपर सीरिज फायनल स्पर्धेत आपले नशीब अजमावणार आहेत़

दुबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, के.श्रीकांत उद्या, बुधवारपासून सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ विश्व सुपर सीरिज फायनल स्पर्धेत आपले नशीब अजमावणार आहेत़ स्पर्धेत दोन्ही खेळाडूंना कठीण ड्रॉ मिळाला आहे़ त्यामुळे त्यांना स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल़
चायना सुपरचे जेतेपद मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेली सायना व श्रीकांतला या स्पर्धेत जागतिक क्रमवारीतील अव्वल ८ खेळाडूंत समावेश असलेल्या खेळाडूंशी झुंजावे लागेल़ ही स्पर्धा दुबईत होणार आहे़
स्पर्धेत सायनाला चीनची शिजियान वांग, कोरियाची ह्युन सुंग आणि यिओन जू बाए यांचा सामना करावा लागेल़, तर श्रीलंकातला पुरुष गटात डेन्मार्कचा यान ओ योगेसेन, जपानचा केतो मोमोतो आणि इंडोनेशियाच्या टॉमी सुगियातोचे आव्हान राहील़ या स्पर्धेच्या प्रत्येक गटातून अव्वल दोन खेळाडू उपांत्य फेरीत पोहोचतील़ सायनाचा शिजियान विरुद्ध ५-५ असा विक्रम आहे़ असे असले तरी गत पाच सामन्यांपैकी ४ मध्ये चिनी खेळाडूने बाजी मारली आहे़
दुसरीकडे सुंगविरुद्ध सायनाचा विक्रम ४-१ असा आहे़ या दोन्ही खेळाडूंत झालेल्या गत लढतीत सायनाला पराभव स्वीकारावा लागला होता़ जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या बाएविरुद्ध सायनाने ६ विजय मिळविले आहेत, तर ४ वेळा भारतीय खेळाडूला पराभवाचा सामना करावा लागला आहे़
पुरुष गटात श्रीकांतच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष राहील़ कारण स्पर्धेत तो एकमेव पुरुष खेळाडू आहे़ त्याने यापूर्वी योगेसेन आणि मोमोतो यांना धूळ चारली आहे, तर सुगियार्तोकडून मात खावी लागली आहे़ स्पर्धेतील ‘अ’ गटाला ग्रुप आॅफ डेथ संबोधले जात आहे़ (वृत्तसंस्था)