शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

हॅट्ट्रिकसह सायना उपांत्य फेरीत

By admin | Updated: December 20, 2014 02:19 IST

भारताची सुपर स्टार बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या काट्याच्या लढतीत कोरियाच्या जू बेई यिओन

दुबई : भारताची सुपर स्टार बॅडमिंटन तारका सायना नेहवाल हिने अतिशय उत्कंठावर्धक ठरलेल्या काट्याच्या लढतीत कोरियाच्या जू बेई यिओन हिचा १५-२१, २१-७, २१-१७ असा पराभव करताना ‘अ’ गटात विजयाच्या हॅट्ट्रिकसह वर्ल्ड सुपर सीरिज फायनल्सच्या उपांत्य फेरीत दिमाखात धडक मारली.सायनाने ही लढत एक तास सहा मिनिटांत जिंकली. पहिला गेम गमाविल्यानंतर सायनाने जबरदस्त मुसंडी मारताना विजय मिळविला. सायनाने तिच्या गटातील पहिल्या लढतीत द्वितीय मानांकित चीनच्या शिजियान वाँग आणि नंतर दुसऱ्या सामन्यात सूं जी हियून यांचे आव्हान मोडीत काढले होते.पहिला गेम गमाविल्यानंतर सायनाने या सामन्यात सनसनाटी निकाल लागतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे सायना पहिल्या गेममध्ये एकवेळ ८-२ अशी आघाडीवर होती; परंतु कोरियन खेळाडूने १४-१४ अशी बरोबरी साधल्यानंतर सलग गुण घेताना पहिला गेम २१-१५ असा जिंकला. दुसरा गेमही चुरशीचा ठरला. या गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी ६-६ अशी बरोबरी साधली होती; परंतु त्यानंतर सायनाने मुसंडी मारताना सलग नऊ गुण आणि नंतर पुन्हा सलग सहा गुण घेत हा गेम २१-७ असा सहज जिंकला.निर्णायक गेममध्ये कोरियन खेळाडूने सुरुवातीला आघाडी घेतली आणि पुन्हा या दोन खेळाडूंत १३-१३ अशी बरोबरी साधली; परंतु सायनाने पुन्हा एकदा मुसंडी मारत सलग पाच गुण घेऊन गुणसंख्या १७-१३ अशी केली. कोरियन खेळाडूने मुसंडी मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला; परंतु सायनाने हा गेम २१-१७ असा जिंकताना उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. (वृत्तसंस्था)