सायना नेहवाल विजेतेपदाच्या उंबरठ्यावर

By Admin | Updated: January 22, 2017 04:30 IST2017-01-22T04:30:08+5:302017-01-22T04:30:08+5:30

भारताची बॅडमिंटन तारका सायना नेहवालने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिचा सरळ गेममध्ये पराभव करून शनिवारी येथे १,२०,००० डॉलर बक्षीस रकमेची मलेशिया मास्टर्स

Saina Nehwal wins the winner | सायना नेहवाल विजेतेपदाच्या उंबरठ्यावर

सायना नेहवाल विजेतेपदाच्या उंबरठ्यावर

सरावक : भारताची बॅडमिंटन तारका सायना नेहवालने हाँगकाँगच्या यिप पुई यिन हिचा सरळ गेममध्ये पराभव करून शनिवारी येथे १,२०,००० डॉलर बक्षीस रकमेची मलेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्डच्या अंतिम फेरीत धडक मारली.
या विजयामुळे विजेतेपदाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या सायनाने एकतर्फी उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित यिन हिचा २१-१३, २१-१० असा सहज पराभव केला.
लंडन आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त सायनाची आता अंतिम फेरीत थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिच्याशी गाठ पडेल. पोर्नपावी चोचुवोंग हिने द्वितीय मानांकित चेयुंग यिन हिच्यावर
एक तास १६ मिनिटे रंगलेल्या
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत
२१-१९, २०-२२, २१-१८ असा विजय मिळविला.
या सामन्याआधी सायनाचा यिन हिच्याविरुद्ध विजयाचा रेकॉर्ड ६-२ असा होता. याआधी २०१० आशियाई स्पर्धेत यिन हिच्याविरुद्ध सायनाला पराभव पत्करावा लागला होता. आता सायनाने तिच्याविरुद्ध आपला विजयाचा रेकॉर्ड सातवर पोहोचवला आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Saina Nehwal wins the winner