शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सायना पराभूत

By admin | Updated: December 20, 2014 22:28 IST

वर्ल्ड सुपर सीरिज फायनल बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला़ त्यामुळे तिचे या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले़

वर्ल्ड सुपर सीरिज फायनल : उपांत्य फेरीच्या सामन्यात तेई जू यिंगकडून पराभव दुबई : भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला वर्ल्ड सुपर सीरिज फायनल बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला़ त्यामुळे तिचे या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्याचे स्वप्न धुळीस मिळाले़ सायनाला ५३ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सेमीफायनल लढतीत चिनी तैपेईच्या तेई जू यिंग हिच्याकडून २१-११, १३-२१, ९-२१ अशी मात खावी लागली़ विशेष म्हणजे या लढतीत सायनाची बाजू वरचढ मानली जात होती; मात्र तिला लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही़ या सामन्यात सायनाने आक्रमक सुरुवात करताना पहिला गेम २१-११ ने सहज आपल्या नावे करीत विजयाच्या दिशेन आगेकूच केली; मात्र जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या तेई हिने पुढचे दोन्ही गेम आपल्या नावे करताना थाटात फायनलमध्ये प्रवेश मिळविला़ सायनाने जबरदस्त कामगिरी करताना पहिल्या गेममध्ये ४-० अशी आघाडी मिळविली़ त्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूला तोंड वर करण्याची संधी न देता २१-११ ने हा गेम आपल्या नावे केला़ दुसऱ्या गेममध्येही सायनाने ४-० अशी आघाडी मिळविली;मात्र तेई जू यिंग हिने जोरदार मुसंडी मारताना तेईने सलग गुणांची कमाई करताना २१-१३ ने गेम जिंकला़ तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सायनाला खेळाचा स्तर उंचावता आला नाही़ तेई हिने तिला अनेक चुका करण्यास भाग पाडले आणि हा गेम २१-९ ने एकतर्फी जिंकून सामन्यात बाजी मारली आणि फायनलमध्ये प्रवेश केला़ (वृत्तसंस्था)