रॉयल स्ट्रायकर्सची विजयी सलामी

By Admin | Published: June 28, 2016 10:51 PM2016-06-28T22:51:02+5:302016-06-28T22:51:02+5:30

अलोक कुमार आणि सौरव कोठारी या कसलेल्या खेळाडूंनी केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर रॉयल स्ट्रायकर्स संघाने स्नूकर प्रीमियर लीग स्पर्धेत विजयी सलामी देताना सॅफरॉन आर्मीचा

Royal striker's winning salute | रॉयल स्ट्रायकर्सची विजयी सलामी

रॉयल स्ट्रायकर्सची विजयी सलामी

googlenewsNext

स्नूकर लीग : अलोक व सौरव यांचा निर्णायक खेळ

मुंबई : अलोक कुमार आणि सौरव कोठारी या कसलेल्या खेळाडूंनी केलेल्या निर्णायक खेळीच्या जोरावर रॉयल स्ट्रायकर्स संघाने स्नूकर प्रीमियर लीग स्पर्धेत विजयी सलामी देताना सॅफरॉन आर्मीचा ३-१ असा पाडाव केला. अन्य एका चुरशीच्या सामन्यात एसपीजी डार्क नाइट्स संघाने बाजी मारताना यूएनएनआयसीए चँलेंजर्स संघाला ३-२ असे नमवले.
महाराष्ट्र बिलियर्स आणि स्नूकर संघटनेच्या मान्यतेने गरवारे क्लब हाऊस येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या ह्यअह्ण गटात सॅफरॉन आर्मीच्या पुष्पेंदर सिंगने धक्कादायक सुरुवात करताना कसलेल्या हसन बदामीला ३१-९, ४४-५ असे नमवून खळबळ माजवली. मात्र यानंतर रॉयल स्ट्रायकर्सच्या सौरवने आशुतोष पांडेला नमवून संघाला बरोबरी आणून दिली. तर अरंताक्सा संचिस - निशांत डोस्सा यांनी कार्तिक झवेरी - सौमिल करकेरा यांना नमवल्यानंतर अलोकने अनुज उप्पलला धक्का देत रॉयल्सच्या ३-१ अशा विजयावर शिक्का मारला.
तर यानंतरच्या चुरशीच्या सामन्यात चँलेंजर्स संघाने एसपीजी डार्क नाइट विरुध्द पिछाडीवरुन दमदार पुनरागमन करुन २-१ असे वर्चस्व घेतले होते. मात्र शिवम अरोरा आणि कमल चावला यांनी आपआपल्या एकेरी लढतीत निर्णायक बाजी मारताना एसपीजीचा ३-२ असा रोमांचक विजय साकारला. (क्रीडा प्रतिनिधी)

 

Web Title: Royal striker's winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.