शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

रायझर्सचे ‘तगडे’ आव्हान

By admin | Updated: May 3, 2015 00:06 IST

डेव्हिड वॉर्नरच्या २८ चेंडूंत ६१ धावांच्या आतषबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जपुढे १९३ धावांचे तगडे आव्हान उभे केले.

हैदराबाद : डेव्हिड वॉर्नरच्या २८ चेंडूंत ६१ धावांच्या आतषबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जपुढे १९३ धावांचे तगडे आव्हान उभे केले. धवनने ३७ धावांची खेळी करीत योगदान दिले. ‘टॉप’ वर असलेल्या चेन्नईविरुद्ध हैदराबादला विजयाची गरज आहे. त्यामुळे सनरायर्झच्या फलंदाजांनी पूर्ण ताकदीनिशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी २० षटकांत २० बाद १९२ धावा केल्या.येथील राजीव गांधी स्टेडियमवरील या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धोनीच्या या निर्णयाला सनरायर्झच्या सलामीवीरांनी आव्हान दिले. शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीने चौफेर फटकेबाजी करीत पहिल्या गड्यासाठी ८६ धावांची दमदार भागीदारी केली. या धावा त्यांनी अवघ्या ८.१ षटकांत काढल्या. धवन दुर्दैवीपणे धावबाद झाला. त्याने ३२ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने ३७ धावा केल्या. त्यानंतर नव्याने आलेल्या हेनरिक्सने धावांचा सपाटा लावला. त्याने अवघ्या ९ चेंडूंत १९ धावा चोपल्या. यामध्ये २ षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. घातक ठरू पाहणाऱ्या हेनरिक्सचा अखेर नेगीने अडथळा दूर केला. धोनीने त्याचा झेल टिपला. त्या आधी, वॉर्नरने अवघ्या २० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. ‘पार्ट टाईम’ गोलंदाज सुरेश रैनाने वॉर्नरला तंबूत पाठवण्याची कमाल केली. तो स्मिथकरवी झेलबाद झाला. ६१ धावांच्या खेळीत वॉर्नरने ११ चौकार आणि एक षटकार ठोकला. तो बाद झाल्यानंतर इयान मोर्गन (नाबाद ३२) आणि नमन ओझा (२०) या जोडीने शानदार फटकेबाजी केली. ओझाला नेहराने त्रिफळाचित केले. एका बाजूने आशिष रेड्डी (६), विहारी (८) हे बाद झाले तर दुसऱ्या बाजूने मोर्गनने फटकेबाजी सुरू ठेवली त्यामुळे सनरायझर्सने १९२ धावसंख्येपर्यंत मजल मारली. चेन्नई सुपर किंग्जकडून ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक ३, तर आशिष नेहरा, सुरेश रैना आणि पी. नेगी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.