शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

विश्वविक्रमाची नोंद!

By admin | Updated: March 12, 2015 00:32 IST

लंकेचा यष्टिरक्षक- फलंदाज कुमार संगकारा याने वन डे क्रिकेटमध्ये सलग चार शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला. विश्वचषकातही सलग चार शतकांची नोंद

होबार्ट : लंकेचा यष्टिरक्षक- फलंदाज कुमार संगकारा याने वन डे क्रिकेटमध्ये सलग चार शतके ठोकण्याचा विश्वविक्रम केला. विश्वचषकातही सलग चार शतकांची नोंद करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. स्कॉटलंडविरुद्ध त्याने बुधवारी १२४ धावा करीत हा विक्रम नोंदविला.याआधी जहीर अब्बास, सईद अन्वर, हर्षल गिब्स, एबी डिव्हिलियर्स, क्वीनटन डिकॉक आणि रॉस टेलर यांनी लागोपाठ तीन शतके ठोकली आहेत. संगकारा या सर्वांच्या पुढे निघून गेला. विश्वचषकात संगकाराच्या आधी मार्क वॉ १९९९६, सौरव गांगुली २००३ आणि मॅथ्यू हेडन २००७ यांनी एका विश्वचषकात प्रत्येकी तीन शतके ठोकली होती. एखाद्या वन डे स्पर्धेत अथवा विश्वचषकात फलंदाजांनी तीन शतके ठोकली, पण चार शतके झळकविणारा संगकारा पहिलाच फलंदाज ठरला. या खेळीदरम्यान संगकाराने आॅस्ट्रेलियात २००० धावादेखील पूर्ण केल्या. डेस्मंड हेन्स याच्या ३०६७ आणि विवियन रिचर्ड्सच्या २७६९ धावा असून, संगकाराने आतापर्यंत येथे २०३८ धावा केल्या. त्याने आॅस्ट्रेलियात स्वत:चे पाचवे वन डे शतकही साजरे केले. लंकेकडून हा नवा विक्रम ठरला. सध्याच्या विश्वचषकात सर्वाधिक ४९६ धावा त्याच्याच नावावर आहेत. दिलशान ३९५ दुसऱ्या, तसेच शिखर धवन ३३३ धावांवर तिसऱ्या स्थानावर आहे. एका विश्वचषकात सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम सचिनच्या नावावर आहे. त्याने २००३ मध्ये ६७३ धावा केल्या होत्या. संगकाराने आज कारकिर्दीतील २५ वे शतक गाठले. वन डे त त्याच्यापेक्षा जास्त शतके सचिन ४९, रिकी पाँटिंग ३० आणि सनथ जयसूर्या २८ यांच्या नावावर आहेत. दिलशानने २२ वे वन डे शतक ठोकून गांगुली, गिब्स, गेल आणि कोहली यांच्याशी बरोबरी साधली.