रत्नागिरीचा रियाज विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2015 00:55 IST2015-10-12T00:46:31+5:302015-10-12T00:55:16+5:30

फेडरेशन कप कॅरम

Ratnagiri Riyaz Winner | रत्नागिरीचा रियाज विजेता

रत्नागिरीचा रियाज विजेता

रत्नागिरी : इंटरनॅशनल फेडरेशन कप कॅरम पुरुष एकेरीमध्ये रत्नागिरीच्या रियाज अकबरअली याने विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या निशांत फर्नांडो याचा त्याने पराभव केला. त्यामुळे रत्नागिरीतून रियाज अकबरअली याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे मूळ वास्तव्य असलेल्या रियाज याने कॅरमच्या अनेक स्पर्धांमध्ये याआधी चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी जागतिक स्तरावरील पुरुष एकेरी कॅरम स्पर्धेत त्याने विजेतेपद पटकावले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ratnagiri Riyaz Winner