ऑनलाइन लोकमत अहमदाबाद, दि. २४ - अहमदाबाद येथे सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळुरूविरुध्द खेळताना राजस्थान रॉयल्सने ९ गडी गमावत १३० धावा केल्या. टॉसचा कौल रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या बाजुने लागला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बंगळुरूच्या कर्णधाराने घेतला. राजस्थान रॉयल्सची सलामीची जोडी फलंदाजीमध्ये फारशी चमक दाखवू शकली नाही. आजिंक्य राहणे १८ धावांवर तर शेन वॉटसन २६ धावा काढून बाद झाले. राजस्थान रॉयल्सला एकापाठोपाठ एक धक्के बसत गेले. राजस्थानकडून सर्वाधिक ३१ धावा स्मिथने केल्या. हुडा १, सॅमसन ४, स्टूअर्ट बिन्नी २० आणि फॉक्नरने केलेल्या २ धावांच्या जोरावर राजस्थानला ९ गडी गमावत केवळ १३० धावापर्यंतच मजल मारता आली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}