शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
3
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
4
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
5
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
6
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
7
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
8
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
11
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
12
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
13
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
14
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
15
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
19
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
20
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
Daily Top 2Weekly Top 5

रैना, जडेजा, भुवी, शमीची ङोप

By admin | Updated: September 7, 2014 01:26 IST

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत चांगली कामगिरी करणा:या सुरेश रैना, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या भारतीय खेळाडूंनी ताज्या मानांकन यादीत उत्तुंग ङोप घेतली आहे.

दुबई : इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत चांगली कामगिरी करणा:या सुरेश रैना, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या भारतीय खेळाडूंनी ताज्या मानांकन यादीत उत्तुंग ङोप घेतली आहे. 
भारताने ही मालिका 3-1 अशी जिंकली आहे. भारताचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज सुरेश रैना याने फलंदाजीत सात, तर गोलंदाजीत दहा स्थानांची ङोप घेतली आहे. जडेजाने फलंदाजीत नऊ स्थानांची, तर गोलंदाजीत भुवनेश्वरकुमारने नऊ आणि मोहम्मद शमीने दहा स्थानांची ङोप घेतली आहे. सलामीवीर शिखर धवनने तीन स्थानांची ङोप घेत सातवा क्रमांक गाठला आहे. या मालिकेत निराशाजनक कामगिरी करणा:या विराट कोहलीला एका स्थानाचा फटका बसला असून, तो चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. तरीही तो टॉप टेनमधील अव्वल भारतीय खेळाडू बनला आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनी सहाव्या क्रमांकावर कायम आहे.  रैनाने मालिकेत 160 धावा केल्या आणि आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर तो ‘मालिकावीर’ बनला होता. या कामगिरीमुळे तो आता 26व्या स्थानावरून 19व्या स्थानावर आला आहे. रवींद्र जडेजा 53व्या स्थानावरून 44व्या स्थानावर आला आहे. बोट दुखावल्यामुळे मालिकेतून बाहेर पडलेला रोहित शर्मा दोन स्थानांनी घसरून 25व्या क्रमांकावर आला आहे. मोहम्मद शमीने मालिकेत सर्वाधिक आठ, तर भुवनेश्वर कुमारने पाच बळी घेतले आहेत. या कामगिरीमुळे भुवी 23व्या स्थानावरून 14व्या, तर शमी 31व्या स्थानावरून 21व्या स्थानावर पुढे आला आहे. (वृत्तसंस्था)
 
याउलट इंग्लिश खेळाडूंना मालिकेतील खराब कामगिरीचा फटका बसला असून ज्यो रुट सोडून इतर सर्वाचे मानांकन घसरले आहे.