शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

रहाणेच्या शतकाने भारताचा डाव सावरला

By admin | Updated: July 18, 2014 02:18 IST

लॉर्डस्च्या वेगवान खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेने झुंजार शतकी खेळी करताना इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताला ९ बाद २९0 पर्यंत पोहोचवले.

लंडन : लॉर्डस्च्या वेगवान खेळपट्टीवर अजिंक्य रहाणेने झुंजार शतकी खेळी करताना इंग्लंडविरुद्ध दुसर्‍या कसोटी सामन्यात भारताला ९ बाद २९0 पर्यंत पोहोचवले.एकवेळ ७ बाद १४५ अशी अवस्था असताना भारतीय संघाचा डाव २00 धावांत आटोपणार अशीच स्थिती होती; परंतु रहाणेने १५४ चेंडूंत १५ चौकार, एका षटकारासह १0३ धावांची खेळी करीत संकटमोचकाची भूमिका बजावली. रहाणेचे सात कसोटीतील हे दुसरे शतक ठरले. त्याने भुवनेश्वर कुमार (३६) याच्या साथीने आठव्या गड्यासाठी ९0 धावांची भागीदारी केली.स्टुअर्ट ब्रॉडला चौकार मारत शतक साजरे करणारा रहाणे ८७ व्या षटकात जेम्स अँडरसनचा बळी ठरला. अँडरसनने २२ षटकांत ५५ धावांत ४ गडी बाद केले.शिखर धवनला बाद करून अँडरसन इंग्लंड भूमीवर सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाजही बनला. त्याने फ्रेड ट्रूमन (२२९ गडी) यांचा विक्रम मोडीत काढला. आता अँडरसनच्या नावावर एकूण ३६३ विकेट झाल्या आहेत. त्यात इंग्लंडमधील २३३ बळींचा समावेश आहे. रहाणेलाही त्यानेच स्वत:च्या गोलंदाजीवर बाद केले. चहापानानंतर रहाणे आणि स्टुअर्ट बिन्नी यांनी अनुक्रमे २६ व ९ धावांवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला; परंतु मोठी भागीदारी होऊ शकली नाही. धावसंख्येत ५ धावांची भर पडते न पडते तोच बिन्नी बाद झाला. अजिंक्य रहाणेला भुवनेश्वरने चांगली साथ दिली. १0१ चेंडूंत ७ चौकारांसह अर्धशतक पूर्ण करणार्‍या रहाणे आणि भुवनेश्वर या दोघांनी ५0 धावांची भागीदारी ७५ व्या षटकांत पूर्ण केली आणि एका षटकानंतर भारताचे २00 धावा पूर्ण झाल्या.इंग्लंडने नवीन चेंडू घेऊन ही भागीदारी ८२ व्या षटकांत तोडली. ब्रॉडने भुवनेश्वरला त्रिफळाबाद केले. त्यानंतर ८७ व्या षटकात शतक पूर्ण केल्यानंतर तीनच चेंडूंनंतर रहाणे तंबूत परतला. दिवसअखेर मोहंमद शमी १४ आणि इशांत शर्मा १२ धावांवर खेळत आहेत.