शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

रघुनंदन श्रीहरीने ग्रँडमास्टर पंत्सुलेयाला रोखले

By admin | Updated: June 4, 2015 01:31 IST

भारताच्या रघुनंदन श्रीहरी याने जबरदस्त खेळ करताना जॉर्जियाचा ग्रँड मास्टर लेवान पंत्सुलेया याला ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.

मुंबई : भारताच्या रघुनंदन श्रीहरी याने जबरदस्त खेळ करताना जॉर्जियाचा ग्रँड मास्टर लेवान पंत्सुलेया याला ८व्या मुंबई महापौर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत बरोबरीवर समाधान मानण्यास भाग पाडले.गोरेगाव स्पोटर््स क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गतविजेत्या पंत्सुलेयाचा विजय गृहीत धरला जात होता. मात्र रघुनंदनने अनपेक्षित कामगिरी करताना सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. इंग्लिश ओपनिंग पद्धतीने सुरुवात केल्यानंतर पंत्सुलेयाने आपला सर्व अनुभव पणास लावत प्रत्येक चालीचा वापर केला. मात्र रघुनंदन कोणतेही दडपण न घेता शांतपणे चाली रचून सर्वांनाच आश्चर्याच धक्का दिला. तब्बल ६५ चालींपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या लढतीत रघुनंदनने कसलेल्या पंत्सुलेयाला चांगलेच झुंजवले. त्याचवेळी अन्य एका धक्कादायक निकालाने स्पर्धेत खळबळ माजली.१७ वर्षांच्या रोहन अहुजाने सनसनाटी विजय मिळवताना ग्रँड मास्टर डॅनिएल सेमसीसेनचा पाडाव केला. डच डिफेन्स पद्धतीने सुरुवात करताना डॅनिएलने बचावात्मक पवित्रा घेतला खरा, मात्र रोहनने आक्रमण व बचावाचा ताळमेळ साधताना डॅनिएलला चुका करण्यास भाग पाडले.२०व्या चालीपर्यंत सामना बरोबरीत सुरू होता. नेमकी याचवेळी केलेली एक चूक डॅनिएलला महागात पडली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना रोहनने सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवला. यानंतर केवळ औपचारिकता राहिलेल्या सामन्यात जबरदस्त हल्ला करताना रोहनने ५४व्या चालीमध्ये विजय निश्चित केला. (क्रीडा प्रतिनिधी)