शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पोलंड उपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 26, 2016 01:59 IST

जेकब ब्लाजसिवोस्कीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पोलंडने पेनाल्टी शूटआऊ टवर स्वित्झर्लंडला ५-४ असे हरवून युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले.

सेंट एटिनी : जेकब ब्लाजसिवोस्कीच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पोलंडने पेनाल्टी शूटआऊ टवर स्वित्झर्लंडला ५-४ असे हरवून युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. पेनाल्टीमध्ये दुसरा शॉट मारण्यास आलेल्या ग्रेनिटी शाकाचा फटका भरकटून गोलपोस्टच्या बाहेर गेला, त्यामुळे तो गोल नोंदवण्यास अपयशी ठरला. त्याचे हे अपयश संघाला पराभवाच्या गर्तेत घेवून गेले.ब्लाजसिवोस्कीने पोलंडला पुर्वार्धात आघाडी मिळवून दिली. परंतु शेरडन शाकिरीने उत्तरार्धात गोल नोंदवून निर्धारीत वेळेत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर अतिरिक्त वेळेतही ही बरोबरी न सुटल्याने सामना अर्थात पेनल्टी शूटआऊ टवर गेला. यात पोलंडने ५-४ अशी बाजी मारली.पोलंडकडून पाचही शॉटवर गोल झाले. स्वित्झर्लंडकडून पहिला गोल लिंचेस्टेनियरने केला. दुसऱ्या फटक्याच्यावेळी मात्र स्वित्झर्लंडला नशीबाने दगा दिला. गोलकिपरने चेंडूच्या विरुध्द दिशेला झेप घेवून मार्ग मोकळा केला होता, परंतु चेंडू गोलपोस्टच्या खांबाला धडकून बाहेर गेला. ही एकमेव चूक स्वित्झर्लंडला महागात पडली आणि त्यांचा पराभव झाला. (वृत्तसंस्था)