शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST

भारतीय खेळाडूंसोबत भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) आणि क्रीडा मंत्रलयाचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आह़े आयओएने आशियाई स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रलयाकडे मोठी यादी पाठविली होती;

इंचियोन : लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक विजेते भारतीय खेळाडू विजय कुमार, एम़ सी़ मेरी कोम, सायना नेहवाल, योगेश्वर दत्त आणि गगन नारंगसह अन्य दिग्गज खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा असल्यामुळे आशियाई स्पर्धेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.  
 या स्पर्धेत भारतीय खेळाडूंसोबत भारतीय ऑलिम्पिक महासंघ (आयओए) आणि क्रीडा मंत्रलयाचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आह़े आयओएने आशियाई स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रलयाकडे मोठी यादी पाठविली होती; मात्र मंत्रलयाने या यादीला कात्री लावली होती़ त्यामुळे आयओए आणि क्रीडा मंत्रलय यांच्यात वाद झाला होता़
या वादानंतर ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता पिस्टल नेमबाज विजय कुमार, कांस्यपदक विजेती मेरी कोम, बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल, नेमबाज गगन नारंग आणि पहिलवान योगेश्वर दत्त यांची आशियाई स्पर्धेत अग्निपरीक्षा असणार आह़े योगेश्वरकडून  सुवर्णपदकांची अपेक्षा आह़े तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आह़े या व्यतिरिक्त  बॉक्सर अखिल कुमार, बॅडमिंटनपटू पी़ कश्यप, पी़ व्ही़ सिंधू, डिस्कस थ्रोअर विकास गौडा, तिरंदाज दीपिका कुमारी, स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल या अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीवर  नजर राहील़  (वृत्तसंस्था)
 
 अपेक्षा मेरी कोमकडून
मेरी कोमला राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्रता मिळविता आली नव्हती; मात्र आशियाई स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आह़े लंडन ऑलिम्पिकनंतर पदकाच्या प्रतीक्षेत असलेली ही खेळाडू आगामी स्पर्धेत पदक मिळवू शकत़े 
नारंगने लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्याची कमाई केली होती; मात्र त्याला ग्लास्गो राष्ट्रकुलमध्ये पदकापासून दूर राहावे लागले होत़े त्यामुळे त्याच्यावर आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचा निश्चित दबाव असेल यात शंका नाही़
 
सायनाने राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती़ आता आशियाई स्पर्धेत पी़ गोपीचंदच्या मार्गदर्शनाखाली खेळण्यास तिने नकार दिला आह़े ती विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळेल.
 
भारताचा द. कोरियाकडून 1क्-क् ने धुव्वा
महिला फुटबॉल प्रकारात बुधवारी भारतीय महिला संघ यजमान द. कोरियाकडून तब्बल 1क्-क् ने पराभूत झाला.जेतेपदाचा प्रबळ दावेदार कोरियाने दोन्ही हापमध्ये प्रत्येकी पाच गोल केले. भारताचा अखेरचा सामना 21 सप्टेंबर रोजी थायलंडविरुद्ध होईल.
 
आशियाई खेळाची मशाल इंचियोनला पोहोचली  
आशियाई खेळांची मशाल उद्घाटन समारंभाच्या दोन दिवस आधी इंचियोनला पोहोचली आह़े या मशालीचा 6 हजार किलोमीटरच्या प्रवासाचा अखेरचा टप्पा शुक्रवारी पूर्ण होणार आह़े