शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘रियो आॅलिम्पिक’ची तयारी फेब्रुवारीपासून करणार

By admin | Updated: January 26, 2015 04:09 IST

पुढील वर्षी ब्राझील येथे (रियो) होणार असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेची तयारी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे

पुणे : पुढील वर्षी ब्राझील येथे (रियो) होणार असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेची तयारी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. सध्या मनगटाच्या दुखापतीपासून सावरत असून, काही दिवसांच्या विश्रांतीनंतर तंदुरुस्ती चाचणी होईल. ‘तमाम भारतीयांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आॅलिम्पिक पदक जिंकून मी सार्थ करीन,’ अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय मुष्ठियोद्धा लाइश्राम सरितादेवी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. सरितादेवी यांनी रविवारी सकाळी ‘लोकमत’च्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींशी संवाद साधत ‘एक खेळाडू व एक व्यक्ती’ म्हणून आपली मते मांडली. ‘लोकमत’चे महाव्यवस्थापक मिलन दर्डा, सरितादेवीचे पती चाँगथम थोयबा, ‘गिरिप्रेमी’चे उमेश झिरपे उपस्थित होते. सरितादेवींना नोव्हेंबर २०१४ महिन्यात मनगटाला दुखापत झाली आहे. या विषयी सरितादेवी म्हणाल्या, दुखापतीमुळे फेब्रुवारीपर्यंत विश्रांती करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. येत्या ९ फेब्रुवारीनंतर तंदुरुस्ती चाचणी होईल. तेथून खऱ्या अर्थाने आॅलिम्पिकच्या तयारीस सुरुवात होईल. दरम्यान, घरी व बेंगलोर येथे सरावाची तयारी केली आहे. त्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. भारतीयांकडून मला खूप प्रेम मिळाले. त्यांनी दाखविलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन. सराव करायचा म्हटला, तरी काही खर्च येतोच. त्यामुळे सतत पैसे उभारण्यास खटपट करावी लागायची. आर्थिक अडचणींमुळे प्रत्येक स्पर्धेला पैशासाठी रडण्याची वेळ यायची. आज राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पदके मिळाल्यामुळे माझी ती स्थिती नाही. खरंच सांगते गरीब खेळाडू केवळ पैशाअभावी खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. अशा खेळाडूंना समाजातून मदत झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)