उपांत्य फेरीसाठी पाक महिला सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 02:13 IST2016-03-26T02:13:45+5:302016-03-26T02:13:45+5:30

बांगलादेशला ९ गडी राखून सहज लोळवल्यानंतर पाकिस्तानने महिला विश्वचषक टी-२0 क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. पाकिस्तानचा शेवटचा सामना बलाढ्य

Preparation of Pak women for the semifinals | उपांत्य फेरीसाठी पाक महिला सज्ज

उपांत्य फेरीसाठी पाक महिला सज्ज

नवी दिल्ली : बांगलादेशला ९ गडी राखून सहज लोळवल्यानंतर पाकिस्तानने महिला विश्वचषक टी-२0 क्रिकेट स्पर्धेतील आपले आव्हान कायम ठेवले. पाकिस्तानचा शेवटचा सामना बलाढ्य इंग्लंडशी असून, यात विजय मिळविल्यास पाकिस्तानला उपांत्य फेरीचे तिकीट मिळू शकेल.
पाकिस्तानी संघ ‘ब’ गटात चार गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. या गटात इंग्लंडने ६ गुणांसह उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली आहे. वेस्ट इंडीज चार गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर यजमान भारत दोन गुणांसह चौथ्या स्थानी आहे.

Web Title: Preparation of Pak women for the semifinals