अजिंक्य रहाणेचे वॉनकडून कौतुक

By Admin | Updated: March 25, 2015 01:15 IST2015-03-25T01:15:37+5:302015-03-25T01:15:37+5:30

टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे़

Praise of Ajinkya Rahane's Von | अजिंक्य रहाणेचे वॉनकडून कौतुक

अजिंक्य रहाणेचे वॉनकडून कौतुक

सिडनी : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधले आहे़ हा युवा फलंदाज पुढील काही वर्षांत क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असेल, असे मत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने व्यक्त केले आहे.
आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी आणि वन-डे मालिकेनंतर भारतीय संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे़ यासाठी संपूर्ण संघ कौतुकास पात्र आहे़ २६ मार्च रोजी होणाऱ्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही हा संघ कामगिरीत सातत्य राखून फायनलमध्ये मजल मारेल, असा विश्वासही वॉन याने व्यक्त केला़

भारतीय संघात एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत़ यांपैकी मला रहाणेची फलंदाजी अधिक आवडते़ हा फलंदाज तंत्रशुद्ध पद्धतीने फलंदाजी करतो़ विशेष म्हणजे, वेगवान आणि फिरकी गोलंदाजांचा तो सहज सामना करतो. हे त्याचे कसब कौतुकास्पद आहे, असे वॉन म्हणाला़

Web Title: Praise of Ajinkya Rahane's Von