झिम्बाब्वे दौरा स्थगित होण्याची शक्यता

By Admin | Updated: June 22, 2015 01:20 IST2015-06-22T01:20:32+5:302015-06-22T01:20:32+5:30

भारताच्या पुढील महिन्यात होणाऱ्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे ढग पसरले असून बीसीसीआय आणि टेन स्पोर्टस् यांच्यादरम्यानचा

The possibility of suspending the Zimbabwe tour | झिम्बाब्वे दौरा स्थगित होण्याची शक्यता

झिम्बाब्वे दौरा स्थगित होण्याची शक्यता

हरारे : भारताच्या पुढील महिन्यात होणाऱ्या झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे ढग पसरले असून बीसीसीआय आणि टेन स्पोर्टस् यांच्यादरम्यानचा मुद्दा वेळेत निकाली न निघाल्यास मालिका पुढील वर्षासाठी स्थगित होऊ शकते, असे संकेत झिम्बाब्वे क्रिकेटने दिले आहेत.
भारतीय संघ मालिकेसाठी झिम्बाब्वेत येण्याची आम्हाला आशा आहे. त्यामुळे मालिकेआधीच मतभेद मिटवण्यासाठी आम्ही सातत्याने बीसीसीआय आणि टेन स्पोर्टस्च्या संपर्कात असल्याचे झिम्बाब्वे क्रिकेटने सांगितले आहे. भारतीय संघाला १0 जुलैपासून झिम्बाब्वेमध्ये तीन एकदिवसीय आणि दोन टी-२0 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. परंतु आता त्यावर प्रश्नचिन्ह उद्भवले आहे.

Web Title: The possibility of suspending the Zimbabwe tour