शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिक बॉक्सिंगमध्ये फिक्सिंगची शक्यता

By admin | Updated: August 3, 2016 04:20 IST

ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने रिओ आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये काही लढती ‘फिक्स’ होण्याची शक्यता वर्तविली आहे

लंडन : रिओ आॅलिम्पिकला काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने रिओ आॅलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये काही लढती ‘फिक्स’ होण्याची शक्यता वर्तविली आहे, पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (आयबा) भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावताना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.ब्रिटनमधील एका वृत्तपत्राने सूत्राचा हवाला देताना म्हटले आहे की, ‘अनेक सिनिअर रेफरी व जज यांचा एक गट प्रतिष्ठेच्या स्पर्धेपूर्वी एकत्र येतो आणि हात व डोक्याच्या संकेतावरून विजेता कसा निश्चित करायचा, हे ठरवतो.’या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात पुढे म्हटले की,‘हौशी बॉक्सिंगमधील अनेक सिनिअर्सनी आॅलिम्पिक पदकांसह काही लढती फिक्स होण्याची शक्यता वर्तवली आहे. अधिकारी आपले वजन वापरून ड्रॉमध्ये फिक्सिंग करू शकतात. कुणाला विजयी करायचे, हे जज निश्चित करू शकतात.’जोपर्यंत आम्हाला कुठले सबळ पुरावे मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशा प्रकारच्या आरोपांवर भाष्य करणार नाही. आम्ही स्पर्धा निष्पक्ष व पारदर्शी कशी होईल, यासाठी प्रयत्नशील आहोत, असे आयबातर्फे स्पष्ट करण्यात आले. वृत्तपत्रात आयर्लंडचे जज सीमस केली यांनी म्हटले आहे की, २०११मध्ये दोहा येथे झालेल्या स्पर्धेदरम्यान त्यांना इशारा करीत सामना फिक्स करण्यास सांगण्यात आले होते. त्यांचे सहकारी अधिकारी भाष्य करण्यास भीत होते. कारण त्यांना भविष्यात मोठ्या स्पर्धेत जजची भूमिका बजावण्याची संधी मिळणार नाही, असे त्यांना वाटत होते.’एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले की, भ्रष्टाचार थेट आयबा प्रशासनाद्वारे केला जातो. प्रतिष्ठेच्या स्पर्धांमध्ये स्कोअरमध्ये फिक्सिंग होते. रिओ आॅलिम्पिकमध्येही असे होण्याची भीती आहे. (वृत्तसंस्था)