शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पॉन्टिंगची सकारात्मकता मुंबई इंडियन्ससाठी उपयुक्त : हरभजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2015 00:37 IST

संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांची सकारात्मक वृत्ती व शांतचित्त स्वभाव कठीण परिस्थितीत संघाला एकसंध राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे

बंगळुरू : संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांची सकारात्मक वृत्ती व शांतचित्त स्वभाव कठीण परिस्थितीत संघाला एकसंध राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू हरभजन सिंगने व्यक्त केली. चार सामन्यांनंतर पराभवाची मालिका खंडित करण्यात यश आल्यामुळे हरभजनने समाधान व्यक्त केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध रविवारी १८ धावांनी विजय मिळविल्यानंतर प्रतिक्रिया देताना हरभजन म्हणाला, ‘‘पॉन्टिंग सकारात्मक व्यक्ती आहे. त्याने कारकिर्दीत अशाच प्रकारचा खेळ केला. विजय मिळविला किंवा पराभव स्वीकारावा लागला तरी पॉन्टिंग नेहमी सकारात्मक असतो. तो प्रत्येकाला शंभर टक्के योगदान देण्याचा सल्ला देतो आणि खेळाडू सध्या त्यासाठी प्रयत्नशील आहेत.’’ हरभजन पुढे म्हणाला, ‘‘संघाला गेल्या चार सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला; पण पॉन्टिंगने मात्र संयम कायम राखला. पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली उन्मुक्त चंदसारख्या अनेक युवा खेळाडूंना शानदार क्रिकेटपटू म्हणून छाप सोडण्यास मदत मिळेल.’’‘‘पॉन्टिंगव्यतिरिक्त मेंटर म्हणून अनिल कुंबळे व सचिन तेंडुलकर संघाच्या दिमतीला आहेत. त्यांची मोलाची मदत होते,’’ असेही हरभजन म्हणाला.हरभजनने सांगितले की, आमच्याकडे अनिल कुंबळे व सचिन तेंडुलकर आहेत. ड्रेसिंग रूममध्ये मोठा अनुभव आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला संघासाठी योगदान देण्यास मदत मिळते. मी गेल्या दोन सत्रांतील कामगिरीबाबत समाधानी असून कामगिरीत सातत्य राखले तर भारतीय संघात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरेन.’’हरभजन पुढे म्हणाला, ‘‘यंदाच्या आयपीएलमध्ये मला विकेट मिळत आहेत. गेल्या मोसमातही माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली होती. मी सर्वाधिक बळी घेणारा फिरकीपटू होतो. मी नेट््समध्ये घाम गाळणे कायम ठेवणार आहे. फलंदाजी व गोलंदाजीमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरलो तर पुन्हा एकदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे.’’ आयपीएलमधील १०० वा सामना खेळण्याबबात बोलताना हरभजन म्हणाला, की ही मोठी उपलब्धी आहे. अशी कामगिरी करणारा हरभजन चेन्नई सुपरकिंग्सच्या सुरेश रैनानंतर दुसरा खेळाडू ठरला आहे. (वृत्तसंस्था)