शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

महिला अ‍ॅथलिटच्या आत्महत्येचा तपास पोलीस यंत्रणा करेल

By admin | Updated: May 10, 2015 04:26 IST

केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) केंद्रातील महिला खेळाडूंच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणे हे पोलिसांचे काम आहे.

नवी दिल्ली : केरळमधील अलपुझा येथे असणाऱ्या स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) केंद्रातील महिला खेळाडूंच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणे हे पोलिसांचे काम आहे. या कायदेशीर प्रक्रियेमध्ये मी हस्तक्षेप करणार नाही; परंतु या प्रकरणात काही तरी शंकास्पद घडले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे या साईचे महानिदेशक इंजेती श्रीनिवास यांनी सांगितले. श्रीनिवास हे या घटनेची माहिती घेण्यासाठी अलपुझाला गेले होते. आपला अहवाल ते क्रीडामंत्र्यांना सादर करणार आहेत. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून ‘साई’च्या ४ अ‍ॅथलिटनी विषारी फळे खाल्ली होती. यात अपर्णा रामभद्रन हिचा मृत्यू झाला, तर इतर तिघींवर उपचार सुरू आहेत. त्यांंची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.श्रीनिवास म्हणाले, ‘‘काही तरी शंकास्पद घडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मुलींनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे उत्तर कायदायंत्रणा देऊ शकेल. मी क्रीडामंत्र्यांच्या सूचनेवरून घटनेची माहिती घेण्यासाठी गेलो होतो. मी त्यांना अहवाल सादर करणार आहे. त्यावर काय करायचे, याचा निर्णय क्रीडामंत्री घेतील.’’श्रीनिवास पुढे म्हणाले, ‘‘अपर्णाची मृत्युपूर्व जबानी, प्रत्यक्ष आत्महत्येची घटना, इतर वाचलेल्या मुलींचे जबाब आणि साई सेंटरवरील इतर प्रशिक्षणार्थींचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत. याबद्दल मी बोलू शकत नाही. ते आमचे नाही, तर पोलिसांचे काम आहे. या प्रकरणात अनेक चौकशी यंत्रणा, पोलीस यंत्रणा, मानवाधिकार आयोग आदी गुंतले आहेत; त्यामुळे मी त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही. आतापर्यंतच्या चौकशीत आत्महत्येच्या कारणाचा शोध लागलेला नाही.’’(वृत्तसंस्था)