शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

खेळाडूंच्या थकव्याकडे लक्ष द्यावे

By admin | Updated: March 31, 2015 23:47 IST

भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करताना बीसीसीआयने खेळाडूंच्या थकव्याच्या मुद्यावर लक्ष देणे आवश्यक आहे,

कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा विचार करताना बीसीसीआयने खेळाडूंच्या थकव्याच्या मुद्यावर लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत माजी राष्ट्रीय निवड समिती सदस्य व्यंकटपती राजू यांनी व्यक्त केले. भारतीय संघाकडे गोलंदाजांची ‘बॅकअप टीम’ असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.२०११ मध्ये विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या भारतीय संघाने अलीकडेच संपलेल्या विश्वकप स्पर्धेत शानदार कामगिरी केली. पण, उपांत्य फेरीत भारतीय संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आॅस्ट्रेलियाने या स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. विश्वकप १९९२ व १९९६ मध्ये भारतीय संघाचे सदस्य असलेले व्यंकटपती राजू म्हणाले, की बीसीसीआयच्या योजनेमध्ये काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. पण, ‘अ’ संघासाठी अधिक दौरे आयोजित होणे आवश्यक आहे. त्यामुळे युवा खेळाडूंची नवी फळी सज्ज राहील. पुढील टी-२० विश्वकप स्पर्धा भारतात खेळली जाणार असून, राजू यांच्या मते, २००७ चा विश्व चॅम्पियन भारत पुन्हा एकदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार राहील. राजू यांनी सांगितले, ‘‘भारतात होणाऱ्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताकडून चमकदार कामगिरीची आशा राहील. भारतीय संघ पुन्हा कामगिरीत सातत्य राखत अव्वल चार संघांत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरेल, असा मला विश्वास वाटतो.’’महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाची प्रशंसा करताना राजू यांनी सांगितले, ‘‘प्रत्येक कर्णधाराची खेळण्याची स्वतंत्र शैली असते. धोनी आपली शैली कायम ठेवतो आणि अनेकदा त्याच्यासाठी ही शैली उपयुक्त ठरते. टी-२० व वन-डे मध्ये भारतीय संघाला यश मिळवून देणारा तो खेळाडू आहे.’’ (वृत्तसंस्था)